सामाजिक

कोणत्याही क्षेत्रामधील सर्वोत्तम गुणवत्ता जपणारा परिवार,हीच सूर्योदय ग्रुपची ओळख – प्रा.नितीन बानगुडे-पाटील

भरगच्च गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सांगोला :

प्रगती,ऊर्जा,समृद्धी आणि सकारात्मकता ओतप्रोत भरलेले नेतृत्व अंगी असलेले या सूर्योदय ग्रुपचे संस्थापक अनिल इंगवले यांनी काही मित्रांना सोबत घेऊन विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये गुणवत्ता,सेवा व विश्वास याचा सुरेख संगम साधत सर्वांच्या साथीने कर्तृत्वाचे सर्वोत्तम साम्राज्य उभे केले.त्यामुळे,कोणत्याही क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता जपणारा परिवार,हीच या सूर्योदय ग्रुपची विशेष ओळख असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केले.

सूर्योदय परिवाराने सांगोला येथे आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात बोलताना प्रा.नितीन बानगुडे-पाटील पुढे म्हणाले की,जगामध्ये क्रांतीचे व कर्तृत्वाचे बीज केवळ शिक्षकच पेरु शकतो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,परमपूज्य साने गुरुजी सारख्या अनेक गुरुजनांचे प्रेरणादायी दाखले देत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सुद्धा पाठीवर शाबासकीची थाप टाकून स्वतःच्या आदर्श कृतीमधून विद्यार्थी घडवणाऱ्या गुरुजनांचे अनमोल महत्त्व अधोरेखित केले.अशा गुरुजनांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर सन्मान सोहळा आयोजित करुन या सूर्योदय परिवाराने नावाप्रमाणेच सर्व क्षेत्रातील आपली व्यापकता सिद्ध केली आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कच्या जीवनशैलीचे अप्रतिम वर्णन करत, यासारख्या कितीतरी कर्तृत्वसंपन्न विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुजनांचे विशेष कौतुक करत उपस्थितांना त्यांनी सुमारे दीड तास मंत्रमुग्ध केले.

यावेळी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणभैय्या पाटील यांनी बोलताना शिक्षण आणि सहकार ही व्यवस्था समाजासाठी उपयुक्त असून सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून या ग्रुपने उभे केलेले उत्तुंग कार्य आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या मराठवाड्यात विशेषतः लातूर धाराशिव भागात देखील असे कार्य उभे करु,असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सुरुवातीला सूर्योदय समूहातील सर्व संस्थांचे संस्थापक आणि एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये,एल के पी मल्टीस्टेट,सूर्योदय अर्बन या संस्थांच्या भक्कम आर्थिक प्रगतीचा लेखाजोगा मांडत सूर्योदयच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा उल्लेख केला.शिक्षक दिन कार्यक्रमासारखे विविध प्रकारचे सन्मान सोहळे, व्यापक स्वरुपातील रक्तदान शिबिरे,विविध प्रकारची आरोग्य शिबिरे,वृक्ष संगोपन मोहीम,ग्रामीण भागातील महिलांचे तीर्थयात्रा दर्शन कार्यक्रम अशा अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे आजवर हजारो माणसे सूर्योदयने जोडली असून सूर्योदय मॉल,दूध विभाग व सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट सारख्या वित्तीय संस्था ग्राहकांचा विश्वास जपत समर्थपणे आपल्या सेवेत आहेत,असे सांगत सूर्योदयच्या या सर्व आर्थिक संस्था आणि उद्योगांवर आपणांसारख्या गुरुजनांच्या आशीर्वादाची छत्रछाया कायम रहावी,अशा भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते जयसिंगतात्या पाटील, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे, सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत गुरुजी, सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतनचे सुभाष दिघे गुरुजी,पंढरपूरचे उपसभापती देशमुख साहेब, उद्योजक अरविंदभाऊ केदार, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ.अर्चनाताई इंगवले,व्हा.चेअरमन सौ. ज्योतीताई भगत,संचालिका सौ.मीनाक्षीताई दिघे,सौ. सुरेखाताई लवटे,संचालक महादेव दिघे सर,उमरग्याचे माजी सभापती सचिन पाटील त्याचबरोबर सूर्योदय सांस्कृतिक परिवाराचे संचालक प्रशांत पाटील, सुभाष अनुसे,महेश नष्टे, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष इंगवले,मोहन इंगवले, अण्णासाहेब इंगवले,एलकेपी मल्टीस्टेट सीईओ राजकुमार बहिरे,सूर्योदयचे अजित दिघे, रिजनल मॅनेजर शशिकांत पाटील सागर काशीद,एरिया मॅनेजर अमोल कांबळे, अविनाश खुळे,क्लस्टर हेड काझी साहेब यांचेसह सूर्योदय समूहातील कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
=========================

चार तालुक्यातील गुणवंत शिक्षक व आदर्श शाळांना पुरस्कार प्रदान :

सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोल्यात दरवर्षी व्यापक स्वरुपात ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी सांगोला,मंगळवेढा,पंढरपूर आणि मोहोळ या चार तालुक्यातील काही गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन, सांगोला येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ‘शिक्षक दिन’ सोहळ्यासाठी शिक्षक, शिक्षिका यांच्यासह उपस्थितांची प्रचंड गर्दी झाली होती.सूर्योदय परिवारावरील प्रेम व कार्यक्रमांचा नेहमीचा उंच दर्जा यामुळे जमलेल्या सारस्वतांच्या अलोट गर्दीमुळे आयोजकांचे अंदाज चुकवत सभागृह अक्षरशः थिटे पडले. सर्व उपस्थितांसाठी उत्कृष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोणत्याही प्रस्तावाशिवाय परस्पर मुल्यमापन करुन जाहीर झालेले पुरस्कार, सूर्योदयच्या स्टाफकडून वेळोवेळी आस्थेने केली जात असलेली विचारपूस,उत्कृष्ट वक्ते आणि कार्यक्रमाची भव्यता यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या.
==============

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button