सामाजिक

दीपावलीनिमित्त सांगोल्यात सूर्योदय अर्बनच्या सभासदांना भेटवस्तूचे वाटप

10 टक्के लाभांश व साखरेचा गोडवा यामुळे दुष्काळातही सभासदांची दिवाळी होणार गोड

सांगोला :

सांगोला शहर,तालुका व जिल्ह्याच्या परिसरामध्ये उद्योग आणि व्यावसायिकांचा आर्थिक कणा म्हणून गेल्या आठ ते दहा वर्षापासून अविरतपणे ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असलेली सूर्योदय अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तसेच सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये कार्यरत असलेली एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त सर्व सभासदांसाठी 10 टक्के डिव्हिडंट यापूर्वीच जाहीर करण्यात आलेला असून डिव्हिडंट वाटपाचा शुभारंभ संस्थेच्या कार्यालयामध्ये नुकताच करण्यात आला. आदर्श नियमावलीनुसार 31 मार्च 2025 रोजीच्या शेअर्स रकमेवर डिव्हिडंड देण्यात येत असून डिव्हिडंट शिवाय सभासदांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दीपावली सणानिमित्त भेटवस्तू म्हणून 5 किलो साखरेचे वाटप देखील संस्थेमध्ये सुरु केले असल्याची माहिती या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

ज्यांचा शेअर्स अडीच हजार रुपयांच्या वर आहे अशा सभासदांनाच भेटवस्तू देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या सभासद बांधवांचा शेअर्स अडीच हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनी त्वरित आपल्या शेअर्सची रक्कम अडीच हजार रुपयांच्या पुढे न्यावी,असे आवाहन देखील यावेळी इंगवले यांनी केले आहे.अगदी आज जरी आपल्या शेअर्सची रक्कम अडीच हजार रुपयांच्या पुढे नेली तरी देखील त्या सभासद बांधवांना भेटवस्तू म्हणून साखरेचे किट देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक व सूर्योदय उद्योग समूहाचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी यावेळी बोलताना सांगितले की,गोरगरीब,शेतमजूर,छोटे छोटे व्यवसायिक तसेच अस्मानी संकट म्हणून उभ्या ठाकलेल्या दुष्काळाशी समर्थपणे दोन हात करणारा बळीराजा यांनी पोटाला चिमटा घेऊन पै पै ने गोळा केलेली आयुष्याची पुंजी सूर्योदय सारख्या संस्थेमध्ये मोठ्या विश्वासाने ठेवलेली आहे.जेव्हा-जेव्हा अस्मानी, सुलतानी संकट समोर येते. तेव्हा ही आयुष्याची पुंजी उपयोगाला येते.या ठेवीवरील मिळणाऱ्या व्याजामधून शेतकरी आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करतो. तेव्हा अशा कठीण काळामध्ये बँकेमधील आपली पत सांभाळून व्यवहार जपणे ही दुष्काळाने गांजलेल्या शेतकरी बांधवांची एक प्रकारची सेवा आहे,असा सेवाभाव सूर्योदय व एलकेपी मल्टीस्टेट परिवारातील सर्व ग्राहक आणि सभासद बांधवांकडून जपला जातो,असे गौरवाने सांगत सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट या संस्थांची वाटचाल कशी सुरु आहे यावर प्रकाश टाकला.कर्ज वितरणाची पद्धत,संस्थेची गुंतवणूक व पारदर्शी कारभार यामुळे सूर्योदय संस्था ही भक्कमपणे वाटचाल करत असून सर्व ठेवीदार आणि सभासद यांनी मनापासून दाखवलेल्या विश्वासास सदैव पात्र राहू,असे सांगत त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अरविंदभाऊ केदार यांनीही तिन्ही संस्थांच्या वाटचालीबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे, सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतनचे जगन्नाथ भगत गुरुजी व एलकेपी मल्टीस्टेटचे व्हॉइस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, सांगोल्यातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.शिवराज भोसले,डॉ.विजयकुमार इंगवले,  संचालक संतोष इंगवले,महादेव दिघे सर,प्रा.संजय यादव,कवडे साहेब त्याचबरोबर बंडोपंत इंगवले,उद्योजक संजय साळुंखे,अण्णासो राऊत, सुभाष अनुसे,अजित दिघे, अण्णासो इंगवले,समाधान केदार,विश्वनाथ इंगोले इत्यादी सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
===========================

संस्थेची 1000 कोटींकडे दिमाखदार वाटचाल सुरु :

ठेवीदारांसाठी उत्कृष्ट व्याजदर देणारी व ग्राहक व सभासदांचे हित नजरेसमोर ठेवत विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देत सोनेतारण कर्ज,दुग्ध व्यवसायासाठी कर्ज,छोटे-मोठे उद्योग आणि व्यावसायिक यांना लागणारे कर्ज,शासकीय नोकरदार व सेवानिवृत्त पेन्शन धारकांसाठी देखील कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणारी सोलापूर जिल्ह्यातील ही एक अग्रगण्य संस्था असून हजारो सभासद व समाधानी ग्राहकांच्या सहकार्याने सुमारे 550 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठत संस्थेची सुमारे 1000 कोटींकडे दिमाखदार वाटचाल सुरु आहे.                                 =============  

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button