सामाजिक

सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळांचा होणार गौरव

प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांची खास उपस्थिती

सांगोला :

सांगोला तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात‌‌ कार्यरत असणाऱ्या काही गुणवंत गुरुजनांना व काही आदर्श शाळांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजन सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले असून सांगोला तालुका,पंढरपूर तालुका,मंगळवेढा व मोहोळ तालुक्यामध्ये शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या विविध विभागातील शिक्षक व शाळांना समाविष्ट करत ‘शिक्षक दिन’ या कार्यक्रमाचे सांगोला येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात येत्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली .

थोर तत्वज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माणसाच्या जीवनामध्ये आई आणि वडीलानंतर ज्यांचं अढळ स्थान असतं ते म्हणजे आपले समस्त गुरुजन. गुरुंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून त्यानिमित्ताने,सांगोल्यात काही गुणवंत गुरुजनांना व काही आदर्श शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजन सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील तरुण पिढीचे नेते व उमरगा जनता सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन युवा उद्योजक शरण बसवराज पाटील,त्याचबरोबर ‘वंदे मातरम’ तसेच ‘शंभुराजे ‘ यासारख्या सुप्रसिद्ध नाटकांचे लेखक,इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी व्याख्यानातून शिवचरित्राचा उलगडा करणारे नामवंत व्याख्याते व युवा पिढीच्या करिअर करिता व्याख्यानातून महाराष्ट्रभर प्रबोधन करणारे ख्यातनाम वक्ते प्रा.नितीन बानगुडे-पाटील या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.त्यांचे अनमोल विचार ऐकण्याची मोठी पर्वणी यानिमित्ताने सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी केले आहे.
========================

गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सूर्योदय परिवाराकडून दरवर्षी घेतला जातो “सन्मान गुरुजनांचा गौरव अभिमानाचा” कार्यक्रम :

महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 43 शाखांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेबरोबरच सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरासह संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र घेऊन यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व सूर्योदय मॉल,वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल,सूर्योदय बँक्वेट हॉल तसेच 4 तालुक्यातील विविध प्लांटच्या माध्यमातून कार्यरत असलेला आणि दीड लाखाहून अधिक दैनंदिन दूध संकलन करणारा सूर्योदय दूध विभाग यासारख्या अनेक लहान-मोठ्या फर्म आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय उद्योग समूह. या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले आणि त्यांचे मित्र सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे,सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत गुरुजी व एलकेपी मल्टीस्टेटचे व्हा.चेअरमन सुभाष दिघे सर यांनी उद्योग व व्यवसायांबरोबरच गेली पंधरा-सोळा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी म्हणून देखील अनेक उपक्रम आजवर राबवलेले आहेत. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना तसेच उद्योग व्यावसायिकांना आर्थिक आधार देणे, हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करुन देणे,त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहत वेळोवेळी गुणवंतांचा सन्मान करणे, अशी सूर्योदय परिवाराची सुरुवातीपासूनची ओळख आहे.सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवून इतरांसमोर आदर्श उभा करणाऱ्या शाळांना ‘सूर्योदय आदर्श शाळा’ हे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वित्तीय संस्था आणि उद्योग व्यवसाय सांभाळत असताना सातत्याने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम घेण्याची सूर्योदय ग्रुपची जवळपास सोळा वर्षापासूनची परंपरा असून गेली तीन-चार वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त “सन्मान गुरुजनांचा गौरव अभिमानाचा” हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात घेऊन गुरुजनांप्रती आदरभाव प्रकट करण्यात येतो.
==============

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button