सांगोला विधानसभा मतदार संघातील २४ गावांमध्ये महिला सभागृह उभारणीसाठी ४ कोटी ७० लाख रु.निधी मंजूर – दीपकआबा साळुंखे-पाटील

नाम.अदितीताई तटकरे यांनी पाळला दिपकआबांचा शब्द
———————————————————

सांगोला :

        बचत गटातील महिलांचे सबलीकरण व्हावे व महिलांना गावामध्ये एक व्यासपीठ निर्माण व्हावे,या दृष्टीने सांगोला विधानसभा मतदारसंघातील विवीध गावांमध्ये महिला सभागृह उभारणीसाठी भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली असता,
महिला व बालविकास मंत्री नाम.अदितीताई तटकरे यांनी २४ गावांमध्ये महिला सभागृह उभारणीसाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच सभागृह बांधकामाची कामे सुरु होणार असल्याची माहिती दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली.

सांगोला विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रॉडक्ट तयार होत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून बनवलेले विविध प्रॉडक्ट आज राज्यातच नव्हे तर,देश पातळीवर पोहोचले आहेत.यामधून अनेक महिलांना अर्थसहाय्य मिळत असल्याने अनेक कुटूंबे आर्थिक बाजूने सक्षम होत आहेत. त्याचबरोबर, महिलांचे सबलीकरण होत असून सांगोला विधानसभा मतदार संघातील दुष्काळी भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मोठे काम केले आहे.महिलांना एकत्रित येऊन बसवण्यासाठी,संघटनात्मक चर्चा,बचत गटाची कामे,दप्तर लिहिणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी बैठक व्यवस्था नाही.तालुक्यातील विविध बचतगटातील महिलांना सभागृह बांधून दिले तर,सदर महिलांचा कायमस्वरुपी प्रश्न मार्गी लागणार असून त्यांना हक्काची बैठक व्यवस्था होणार आहे.  यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी माजी आम.दीपकआबा यांनी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे केली होती.सदर मागणीची दखल घेऊन सांगोला विधानसभा मतदार संघातील २४ गावांमध्ये महिला सभागृहासाठी ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

             मंजूरीप्रमाणे लवकरच सभागृह उभारणीचे कामकाज सुरु होणार असून या निमित्ताने बचत गटातील महिलांना संघटनात्मक चर्चांसाठी एक व्यासपीठ तयार होऊन यामधून बचत गटाच्या अर्थकारणाला,महिला सबलीकरणाला आणि बचत गटाच्या उद्योग व्यवसायाला गती मिळणार आहे,असेही दीपकआबा यांनी यावेळी सांगितले.
————————————————————

महिलांसाठी सभागृह बांधणेकरिता मंजूर झालेली गावे व निधी :

जवळा – २० लाख,भोपसेवाडी – २० लाख,कोळा – २० लाख, हातीद – २० लाख,संगेवाडी – २० लाख, अजनाळे – २० लाख, वाटंबरे – २० लाख,पाचेगाव – २० लाख,हंगीरगे – २० लाख, यलमार मंगेवाडी – २० लाख,चिकमहुद – २० लाख, आलेगाव – २० लाख,मेडशिंगी – २० लाख,धायटी – २० लाख,उदनवाडी – १० लाख,पारे – २० लाख,मांजरी – २० लाख,भंडीशेगांव – २० लाख, पळशी – २० लाख,भाळवणी – २० लाख,उपरी – २० लाख, खेडभाळवणी – २० लाख,गार्डी – २० लाख,सोनके – २० लाख.
असे एकूण ४ कोटी ७० लाख निधी मंजूर झाला आहे.
—————————————————————

महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच सर्वात मोठा निधी मिळाला :

बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी गरुडझेप घेतली असून या उद्योगाच्या माध्यमातून अनेक कुटूंबांमध्ये आर्थिक क्रांती घडत असताना,बचत गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी सर्वप्रथम महिला सभागृह असणे गरजेचे आहे.सभागृह बांधकामासाठी महिलांकडून अनेकदा मागणी होत असताना या मागणीची दखल घेऊन माजी आमदार दीपकआबा यांनी पुढाकार घेऊन तालुक्याच्या विविध गांवांमध्ये सभागृह बांधकामासाठी निधीची मागणी केली आणि तो मंजूरही करुन आणला.अनेक वर्षाच्या मागणीनंतर आता महिलांसाठी स्वतंत्र दालन उभा राहणार असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील बचत गटाच्या महिलांनी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच माजी आमदार दीपकआबा यांचेही आभार मानले आहे.
—————————————————————