भाळवणी येथील महिला मेळाव्यास ‘न भूतो न भविष्यती’ असा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दीपकआबांच्या नावाने घोषणा देत महिलांनी दुमदुमून सोडला परिसर—————————————————————
सांगोला :
कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सांगोला आयोजित,शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी (ता.पंढरपूर) येथे “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भाळवणी येथे झालेल्या महिला मेळाव्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.”जागर स्त्रीशक्तीचा होम मिनिस्टर पैठणीचा” या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी दीपकआबांचे आगमन होताच औक्षण केले आणि दीपकआबांच्या नावाने घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला होता.”न भूतो न भविष्यती” अशा या कार्यक्रमासाठी भाळवणी व परिसरातून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी जि.प.च्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे,चारुशिलाताई काटकर,मधुमतीताई साळुंखे-पाटील,डॉ.नेहाताई साळुंखे-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर महिला तालुकाध्यक्षा राजश्री ताड,आरपीआयच्या तालुकाध्यक्षा अविंदा गायकवाड,ज्योती लोखंडे,विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे,सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,आर.डी.पवार सर,राहुल ताटे,गणेश माने आदी उपस्थित होते.
शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच आदिशक्तीचा उत्सव या निमित्ताने स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी यासह त्यांचा सन्मान करण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.तुफान कॉमेडी आणि उखाणे तसेच मनोरंजन यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला.महिलांसाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत,यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यात या कार्यक्रमाचा हातभार लागला असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.यासह आबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू,असा विश्वासही दिला.
“होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” स्पर्धेमध्ये ललिता सुनील लिंगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.त्यांना पैठणी व नाकातील नथ बक्षीस म्हणून देण्यात आली.निर्मला सुभाष तारळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.त्यांना एलईडी टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात आली. मीनाक्षी संदिपान हंखंडे यांनी तृतीय क्रमांक पटकावत आटा चक्की बक्षीस संपादन केले.वर्षा देविदास पवार (तिसंगी) यांनी चतुर्थ क्रमांक मिळवत शिलाई मशीन बक्षीस मिळवले आहे.यासह उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.“होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमासाठी उत्कृष्ट गायिका अश्विनी हरिदास यांच्या सुमधुर गीताने महिलांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.नेहा साळुंखे-पाटील यांनी केले.तर, आभार मधुमतीताई साळुंखे-पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी भाळवणी,जैनवाडी,धोंडेवाडी,सोनके, तिसंगी,गार्डी,लोणारवाडी,केसकरवाडी,शेंडगेवाडी आदी परिसरातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.
—————————————————————
वयोवृध्द महिलेने काढली दीपकआबांची दृष्ट :
खेड्यापाड्यातील सामान्य व तळागाळातील महिलांना एक व्यासपीठ उभा करुन देत महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला म्हणून “माझा आबा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात आमदार झाला पाहिजे”,असे म्हणून कमल यादव या वयोवृद्ध महिलेने स्टेजवर जाऊन दीपकआबांची दृष्टचं काढली.
—————————————————————