गरीब,वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेला सध्या भरघोस प्रतिसाद मिळत आहे.तर दुसरीकडे,राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थदर्शन” या योजनेचीही घोषणा केली असून “मुख्यमंत्री तीर्थदर्शन” योजनेंतर्गत राज्य सरकार ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना देशभरातील ७३ व राज्यातील ६६ अशा एकूण १३९ तीर्थक्षेत्रांचे मोफत देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा,राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.या योजनेंतर्गत केवळ राज्यातीलच नव्हे,तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल,अशी माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा राज्यातील जनतेला पुन्हा एकदा अनुभव येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे.या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदानही मिळणार असल्याचे आमदार शहाजीबापू यांनी सांगीतले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांसाठी देशभरातील ७३ आणि राज्यातील ६६ अशी एकूण १३९ तीर्थक्षेत्रे निर्धारित करण्यात आली आहेत.
“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज,आधार कार्ड,रेशनकार्ड,जन्म दाखला,मतदार ओळखपत्र,शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे,केशरी रेशनकार्ड सादर करावे लागणार आहे.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकार जेष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा,राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.केवळ राज्यातीलच नव्हे,तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येणार आहे.
—————————————————————
ज्येष्ठांच्या आशीर्वादाने महायुतीच्या सरकारला ऊर्जा व प्रेरणा मिळेल :
जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते,पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्राला जाण्याची सुप्त इच्छा असते.परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यातील गरीब,वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन,महायुतीचे सरकार कटिबध्द असून राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद महायुती सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.
– आमदार शहाजीबापू पाटील ——————————————————————————