सोलापूरात होणार्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे
सांगोला :
चर्मकार समाजाच्या मागील ३०-३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या व अडीअडचणींवर चर्चा आणि विचार विनीमय करण्याकरिता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव (नाना) घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संयोजन समितीच्या वतीने आज बुधवार दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील रंगभवन चौकातील जिल्हाधिकारी बंगल्याशेजारी असलेल्या समाज कल्याण केंद्रात
चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे यांनी केले आहे.
समाजसेवेसाठी अविरतपणे झटणारे व समाज संघटनेचे काम महाराष्ट्रात प्रथमच करुन समाज एकत्रित आणण्याचे महान काम करणारे समाजाचे ज्येष्ठ नेते बबनराव उर्फ नाना घोलप यांच्या आवाहनाला साथ देऊन सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब बांधवांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी संघटनेमध्ये प्रगल्भता आणून मोठ्या प्रमाणात संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संघामध्ये तरुण वर्गांना संधी देण्याच्या उद्देशाने संघटनेतील आजी-माजी पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन निवडीही करण्यात येणार आहेत.
तरी,राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या समाज मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगोले तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघ,सोलापूर जिल्हा यांच्या वतीने सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे यांनी केले आहे.
———————————————————————————