दीपकआबांंच्या भेटीने भंडीशेगाव,शेळवे व खेडभाळवणीतील जनतेत चैतन्य
सांगोला :
सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील लोकांशी हितगुज व चर्चा विनीमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आयोजित केलेल्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यादरम्यान आबांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. दीपकआबांंच्या भेटीमुळे भंडीशेगाव, शेळवे व खेडभाळवणीतील जनतेत एक प्रकारचे चैतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र दिसून येत होते.
दीपकआबांच्या गावभेट दौऱ्यात यावेळी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेडभाळवणी येथील माजी प्राचार्य आर.डी. पवार,सरपंच संतोष साळुंखे,मा.उपसरपंच लक्ष्मण साळुंखे,माजी प्राचार्य डी.जे.साळुंखे,शहाजी साळुंखे, बिभीषण पवार,भारत साळुंखे,ज्ञानोबा पवार,राहुल पवार,अनंता घालमे,शहाजी पाटील,सचिन घालमे, पोपट घालमे,प्रकाश पवार,बाळासाहेब पवार,रघुनाथ साळुंखे व धोंडीबा साळुंखे तसेच भंडीशेगाव येथील दौर्यात वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ माने,गंगाराम विभुते,विजय कदम, गणेश पाटील,संजय रणखांबे,नवनाथ माने,विश्वास सुरवसे,रामकृष्ण कवडे,रमेश शेगावकर,सतीश रणखांबे,ज्ञानेश्वर गिड्डे,विलास यलमार,संतोष ननवरे, भास्कर ननवरे,मोहन घाडगे,चाँद लांडगे व धोंडीराम चव्हाण तर,शेळवे येथील दोर्यात,दशरथ पाटील, अनिल गाजरे,तुकाराम गाजरे,शशिकांत नागटिळक, किरण गाजरे,परमेश्वर आसबे,सुधाकर गाजरे,समाधान गाजरे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जि.प.गटातील भंडीशेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर,वेताळवाडी, गणेश मंदिर परिसर,आझाद चौक परिसर,बुध्द विहार १ व २ परिसर,अण्णाभाऊ साठे नगर,डोंबारी वस्ती परिसर,शाहूनगर परिसर,कोळ्यांचा मळा परिसर,माने वस्ती,चव्हाण वस्ती,म्हाळुंगकर वस्ती,कवडेवस्ती, सुरवसेवस्ती,उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी दीपकआबांनी संवाद साधला.
तसेच दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर, वकील वस्ती,दंडवस्ती,खंडोबा मंदिर परिसर,बंडाचा मळा परिसर,दादाचा मळा परिसर तसेच बरडवस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडी अडचणी, व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.तसेच,सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवारवस्ती,जुना अकलूज रस्ता परिसर,रेणुकानगर,शिवाजीनगर, जिजाऊनगर,संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून आबांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या विवीध समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
————————————————————
भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करुनच या जि.प. गटातील मतदारांकडे पाहिले होते.परंतु,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे प्रथमच प्रत्येक गावातील वाड्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत.भाळवणी जि.प. गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला असून दिपकआबांच्या कामाची व संपर्काची या जि.प. गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल,असा विश्वास ग्रामस्थांनी दिला.
——————————————————————————