सामाजिक

माजी नगरसेवक शिवाजी बनकर यांना “राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार” प्रदान

सांगोला :

      राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक तसेच उद्योग व व्यवसाय आदी क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करुन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे कट्टर समर्थक व सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने “राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

                       श्री संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पुणे येथील समता भूमीवर श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार व विशेष पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सांगोल्याचे माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ,महाराष्ट्र राज्य यांचेवतीने “राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार” देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.

माजी आमदार दीपकआबांचे कट्टर समर्थक शिवानाना बनकर यांना “राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार” मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे हस्ते तुळशीचा हार व पांढरा फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवानाना बनकर यांचा सांगोला शहरातील शिवाजीनगर येथेही जंगी सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी युवा नेते डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील,युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील,ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील,माजी नगरसेवक सिध्देश्वर (नाथा मालक) जाधव,सूर्याजी खटकाळे,राजू पाटील,नंदकुमार दिघे, अनिल दिघे,बिरुदेव भजनावळे,डॉ.धनंजय पवार, सचिन पाटणे,महादेव दिघे सर,महादेव कांबळे,रवींद्र कांबळे इ.उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button