सामाजिक

बंधन बँकेची महिलांसाठी “अवनी” ही खास योजना

सांगोला :

सांगोला शहरात बँकींग क्षेत्रात गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बंधन बँकेकडून खास करुन महिलांसाठी “अवनी” या योजनेअंतर्गत सेव्हींग्ज अकाउंट,एटीएम,डेबिट कार्ड तसेच अपघाती विमा व हवाई विमा या सर्व सुविधा कोणताही चार्ज न आकारता देण्यात येणार असल्याची माहिती या बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी दिली.

बंधन बँकेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगोला इनरव्हील क्लबच्या आयएसओ संगीता चौगुले यांचे हस्ते “अवनी” या योजनेचे उदघाटन करण्यात आले.बंधन बँक ही गेल्या ९ वर्षांपासून सांगोला शहर व तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्यरत आहे.

“अवनी” या योजनेअंतर्गत महिलांसाठी सेव्हींग्ज अकाउंट, एटीएम व डेबिट कार्ड तसेच अपघाती विमा व हवाई विमा या सर्व सुविधा कोणताही चार्ज न आकारता देण्यात आली असून महिलांनी खाते उघडून या सर्व योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा,असे आवाहन बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी यावेळी केले.वर्धापनदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button