पेपर चोरीच्या गुन्ह्याचा सांगोला पोलिसांनी लावला २४ तासांत छडा
सांगोला :
सांगोला शहरातील विद्यामंदिर प्रशालेच्या दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा छडा सांगोला पोलिसांनी केवळ २४ तासांत लावून आपली कार्यतत्परता दाखवली असून पोलिसांनी चोहोंबाजूनी तपास करत मुद्देमालासह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दि.१७ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४५/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२९ (३), ३३४,३०५ (अ) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगोल्याच्या शैक्षणिक क्षेत्रात कधी नाही ते पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विविध शोध पथके तयार करुन तपासाला सुरुवात केली.या घटनेत आरोपीने अत्यंत नियोजनपूर्वक इलेक्ट्रिक कटरचा वापर करुन दरवाजा तोडल्याचे निदर्शनास आले होते.या पार्श्वभूमीवर,तांत्रिक तपास,सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली.तपासादरम्यान असे समोर आले की,हा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने केला आहे.संबंधित बालकाला संशयावरुन ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या उपस्थितीत सखोल चौकशी केली असता,त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी,आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक कटर,इलेक्ट्रिक मोटारसायकल तसेच चोरीस गेलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त केल्या.
या संपूर्ण कारवाईदरम्यान,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली.
या कारवाईत सपोनि वाघे,सपोनि मोरे,पोसई पुजारी, पोसई पाटील,मपोसई चव्हाण,पोहेकॉ.वाघमोडे,पोहेकॉ. अस्लम काझी,पोहेकॉ.वजाळे,पोहेकॉ.राजगे,पोहेकॉ. सावंत,पोहेकॉ.प्रमोद गवळी,पोहेकॉ.संतोष देवकर,पोहेकॉ. क्षीरसागर,पोहेकॉ.जाधव,पोना.लेंगरे,पोकॉ.पाटील,पोकॉ. मारुती पांढरे,पोकॉ.माळी,पोकॉ.कुंभार,पोकॉ.राजू आवटे,पोकॉ.अमोल वाडकर,पोकॉ.रमेश सुर्यवंशी, पोना.इरकर,पोकॉ.वाघमोडे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मोरे हे करत आहेत.
===================================
More Stories
दागिने व मोटार सायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सांगोला पोलीसांना यश
तब्बल २५ तोळे सोन्यासह आरोपीला पकडण्यात सांगोला पोलीसांना यश
चोरीला गेलेले तब्बल ३६ लाखांचे १४५ मोबाईल सांगोला पोलीसांनी दिले शोधून