शैक्षणिक

मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे

  1. अकोला येथे रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची ९६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 

सांगोला :

शिक्षण,अर्थ व शेती व्यवस्था यांचा अभ्यास करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावण्यासाठी जिल्हा व देश या मर्यादेतच न राहता मुलींनी शिक्षणासाठी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे,असे मत अकोला येथे आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.शिवानी महेश आसबे (कृषी अभियांत्रिकी) यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील अकोला येथील सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स (कृषि)येथे रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची ९६ वी पुण्यतिथी नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.शिवानी आसबे या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कु.सुचिता बाळासाहेब आसबे म्हणाल्या की,रयत माऊली विषयीचे महत्व व प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,असे सांगून रयत शिक्षण संस्थेने सांगोला तालुक्यातील अकोला,मांजरी व महूद या शाखांमध्ये इंटरअॅक्टीव बोर्ड उपलब्ध करुन दिले आहेत तरी,त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी अध्ययनात करुन घ्यावा,असे विचार कु.सुचिता आसबे यांनी
आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

                कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्या केशव माने (माजी रयतसेविका) यांनी रयत माऊलीच्या त्यागाविषयी माहिती देऊन आजच्या युगातील AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे महत्त्व व नितीमूल्यांची जोपासना करावी,असे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा.नानासाहेब लिगाडे सर,पर्यवेक्षक व्यवहारे आर.ए., उद्योगपती बाळासाहेब आसबे,कु.सायली आसबे,कु.मोहिनी खटकाळे,कु.नम्रता आसबे,कु.अंजली गायकवाड,अनिल शिंदे तसेच ग्रामस्थ,अकोला परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व पालक सिद्धेश्वर शिंदे आणि स.शा.लिगाडे विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक जवंजाळ एस.एम.यांनी केले तर,पाहुण्यांची ओळख अतुल पाटील सर यांनी करुन दिली. यावेळी,विद्यार्थ्यांनी रयत माऊलींचा त्याग व त्यांनी केलेले अथक परिश्रम याविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनीच भोजनाचा गोड आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोरपडे डी.टी यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या देणगीदारांचे व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे घोडके पी.डी यांनी आभार मानले.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button