आरोग्य

स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

स्व.आम.डॉ.गणपतराव देशमुख मेडिकल फाउंडेशनचा रतनबाई देशमुख यांच्या हस्ते श्रीगणेशा

स्व.आम.डॉ.गणपतराव देशमुख मेडिकल फाउंडेशनचा रतनबाई देशमुख यांच्या हस्ते श्रीगणेशा

सांगोला :

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी तसेच जयंतीनिमीत्त सांगोला तालुक्यातील शेतकरी कष्टकरी यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी,यासाठी नुकतेच आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख,डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख व विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी घेतलेला जनसेवेचा वसा व वारसा पुढे अखंडपणे चालू ठेवण्याचे काम देशमुख कुटूंबियांच्या माध्यमातून होत आहे.स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख मेडिकल फाउंडेशनचा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गणेशा करण्यात आला. स्व.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांनी जो सामाजिक बांधिलकी व जनसेवेचा घेतलेला वसा आणि वारसा पुढे अखंडपणे चालू ठेवण्याचे उद्देशाने देशमुख कुटूंबियांच्या माध्यमातून फाउंडेशन स्थापन करण्यात आले.स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे दोन नातू व नात सुना या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असून त्यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील व आजूबाजूच्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची मोफत आरोग्य सेवा घडावी,हा या फाउंडेशनचा उद्देश आहे.यासाठी स्व.भाई डॉ.गणपतराव देशमुख यांच्या मेडिकल फाउंडेशनचा श्री गणेशा विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी,डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख,डॉ.प्रभाकर माळी,डॉ.अमर शेंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

सदर शिबिरासाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.यामध्ये फिजिशियन डॉ.सुनिल कारंडे, नेत्ररोग तज्ञ डॉ.सुनिता कारंडे,कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ.अमित इनामदार, कान-नाक-घसातज्ञ डॉ.सचिन वाघमोडे,स्पाईन सर्जन डॉ.हिमांशु कुलकर्णी (मिरज),डॉ.अमर शेंडे,डॉ.शिवराज भोसले,डॉ.मच्छिंद्र सोनलकर,डॉ.धनंजय गावडे,डॉ.अजिंक्य नष्टे, डॉ.सचिन गवळी,डॉ.बसवेश्वर पाटील,डॉ.राजेंद्र जानकर,डॉ.सुनील लवटे,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.स्वाती खंडागळे,डॉ.एच.व्ही.गावडे,डॉ.वैभव जांगळे इ.उपस्थित होते.

सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न असणारे सर्व रुग्णालय व सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,सांगोला ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व सर्व कर्मचारी महालॅब यांच्या माध्यमातून रक्त तपासणी करण्यात आली.तसेच बोन डेन्सिटी टेस्ट म्हणजेच हाडाची ठिसूळता याबाबत तपासणी ही पुणे येथील वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे तालुका समन्वयक नागेश बनसोडे व टीम यांच्यामार्फत सर्व रुग्णांना आयुष्यमान कार्ड व गोल्डन कार्ड काढून देण्यात आले.

सदर महाआरोग्य तपासणी शिबीरासाठी उद्योगपती गिरीशभाऊ नष्टे यांनी हॉल उपलब्ध करुन दिला. नॅब आय (कुपवाड,सांगली) आणि डॉ.थेंगील यांच्या वतीने डोळे तपासणी करण्यात आली.शहाजी गडहिरे यांच्या अस्तित्व संस्थेमार्फत मोफत चष्मे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.विजय बंडगर यांनी केले तर,कार्यक्रमाचे आभार डॉ.निरंजन केदार यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण घाडगे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन हे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी मार्फत करण्यात आले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button