सांगोला :
सांगोला शहरातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत मूत्ररोग निदान,उपचार व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.परेश खंडागळे यांनी दिली.
सदर शिबिरामध्ये मूत्ररोग,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे, लघवीसंबंधी आजार इ.आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.
या शिबिरासाठी सर्व रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे,अशा रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया ही केशरी,पिवळे तसेच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठीही महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना या योजनांमार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.तरी,मोफत मूत्ररोग उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोरगरीब व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन खंडागळे हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
दक्षता मल्टीस्पेशालिटीमध्ये महिनाभर मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर