सांगोला :
सांगोला तालुक्याच्या अनेक गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करणे गरजेचे असल्याने
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्याने शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेवून सदरची योजना चालू न झाल्यास सांगोला तालुक्यातील ८२ गावे व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवणार असून त्यामुळे,सदर योजना तातडीने कार्यान्वित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून दिली.या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना टंचाई निधी मधून ५.४१ कोटी इतकी थकबाकी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. या आदेशाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनीही लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.
या योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून आता लवकरच शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा ही योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार डाॅ.देशमुख यांनी यावेळी दिली.
——————————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे-भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर