सामाजिक

महूद येथे स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

मोफत आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
=========================                   खाऊचे ३५०० पाकीट वाटप

 

सांगोला :

     सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते,स्वर्गीय आमदार भाई डॉ.गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या ९९ व्या जयंती निमित्त महूद बु !! येथील शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने ३५०० खाऊ पाकीटांचे वाटप करण्यात आले.तसेच मोफत आरोग्य तपासणी व मोफत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर अशा विविध उपक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली.

स्वर्गीय आबासाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत आयुष्यमान कार्ड शिबीरास महूद गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सदरचे शिबिर दक्षता हॉस्पिटल व लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महूद ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपन्न झाले.या शिबिरामध्ये मोफत आयुष्यमान कार्ड काढून देणे तसेच मोफत सर्वरोग,मुतखडा व मूत्ररोग तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांवर शिबिरा अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिराचे उदघाटन प्रसंगी स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी,महूद पंचक्रोशीतील सर्व नेतेमंडळी आजी-माजी जि.प.व पं. समिती सदस्य,आजी-माजी सरपंच-उपसरपंच,विकास सोसायटीचे सदस्य,विवीध संस्थाचे पदाधिकारी तसेच
डॉ.निरंजन केदार,डॉ.ऐश्वर्या कारंडे,डॉ.सुमित विभुते, दक्षता हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ,अमर चव्हाण,धनराज ॲम्ब्युलन्सचे सचिन चांदणे आणि पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबिरात विविध आजाराच्या तब्बल २५३ रुग्णांची व ग्रामस्थांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच मूत्ररोगाच्या रुग्णांची तपासणी करुन आवश्यक त्या उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तर,मोफत आयुष्यमान कार्ड काढून देण्याच्या शिबिरामध्ये (एकत्रित प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना) एकूण १२१ ग्रामस्थांचे मोफत आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले आणि गरजू रुग्णांना शस्त्रक्रिये संदर्भातही सल्ला देण्यात आला.

            याप्रसंगी,शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने महुद चौकात लाडूचे वाटप करण्यात आले.तसेच महुद बु !! गावातील व वाड्या वस्त्यावरील सर्व शाळा तसेच काॅलेजच्या विद्यार्थांना व शिक्षकांना ३५०० खाऊ पाकीटांचे वाटप करण्यात आले.स्व. आबासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वरील सर्व सामाजिक उपक्रमांमुळे स्व. आबासाहेब प्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहिती चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button