सांगोला :
प्रखर हिंदुत्ववादी,जाज्वल्य देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी व त्यांचे कार्य तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टी,शिवसेना, सावरकरप्रेमी व इतर मित्र पक्षाच्या वतीने सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरुन रविवारी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” काढण्यात आली होती.

या गौरव यात्रेत अकलूजचे नेते तथा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड,भाजपाच्या प्रांतिक सदस्या राजश्रीताई नागणे-पाटील,भाजपाचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,जेष्ठ नेते संभाजीतात्या आलदर,शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, नागेश जोशी, डाॅ. विजय बाबर,डाॅ.मानस कमलापूरकर,लक्ष्मीकांत लिगाडे,महेश नलवडे,शंकर काळे,तेजस कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी,अनिल वाघमोडे,प्रविण जानकर यांचेसह भाजप-सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन