शैक्षणिक

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळास संस्थापक स्व.नारायणराव भगरे यांचे नाव द्या – अकोला व डोंगरगाव ग्रा.पं.ची लेखी ठरावाद्वारे मागणी

 

सांगोला : 

 सांगोला तालुक्यातील एक नावाजलेली शिक्षण संस्था असा लौकिक असलेल्या सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला या संस्थेस संस्थापक स्व.नारायणराव भगरे यांचे तर,या संस्थेअंतर्गत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजला स्व.भाई जगन्नाथराव लिगाडे तसेच माध्यमिक प्रशालेस स्व.माणिकराव बाबर यांचे नाव देण्यात यावे,अशा आशयाचा ठराव अकोला व डोंगरगाव ग्रामपंचायतीने केला असून या ठरावाची प्रत शनिवार दि.३१ मार्च रोजी संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्याकडे देवून लेखी निवेदनाद्वारे तशी मागणी करण्यात आली असून यावेळी स्व. नारायणराव भगरे यांचे चिरंजीव दिपक भगरे,विष्णू भगरे,दत्तात्रय भगरे,बाळासाहेब लिगाडे,दत्तात्रय लिगाडे,नितीन लिगाडे,बाळासाहेब सुरवसे,अनिल नकाते इ.उपस्थित होते.

सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे,म्हणून स्वर्गीय नारायणराव भगरे यांनी १९६९ मध्ये सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु करण्यात आला.खूप अपेक्षा व जबाबदारीने सुरु केलेली ही शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या स्व.माणिकराव बाबर यांना विनंती करून त्यांना अत्यंत जोखमीची जबाबदारी दिली. आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याने माणिकराव बाबर यांनी ही जबाबदारी हसत-हसत स्वीकारली.संस्थेचा विकास करत असताना स्वतः माणिकराव बाबर यांनी प्रसंगी दगड उचलण्यापासून संस्थेच्या इमारतीवर पाणी मारणे, गवंड्याच्या हाताखाली दगड माती देणे,अशी कामे करून संस्था उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला.
१९९१ मध्ये या संस्थेंतर्गत वरिष्ठ महाविद्यालय सुरु करत असताना अनामत रक्कम भरण्यासाठी सुद्धा संस्थेकडे पैसे नव्हते.यावेळी स्व.भाई जगन्नाथराव लिगाडे यांनी स्व.नारायणराव भगरे व स्व.माणिकराव बाबर यांच्या विनंतीला मान देऊन स्वतः लोकवर्गणी आणि देणगी स्वरूपात तब्बल ३ लाख रु.गोळा केले आणि ही अनामत रक्कम भरल्यानंतर सध्या नांवारुपास आलेले विज्ञान महाविद्यालय हे १९९१ मध्ये सुरु केले. पुढे २००४ रोजी NAAC मूल्यांकन करतानाही संस्थेसाठी लागणारे पैसे स्व. जगन्नाथराव लिगाडे यांनी लोकवर्गणी आणि देणगी स्वरुपात गोळा केले व आज ही संस्था नांवारुपाला आली. संस्थापक स्व.नारायणराव भगरे यांचेसह संस्था उभारणीत सिंहाचा वाटा असणारे स्वर्गीय भाई जगन्नाथराव लिगाडे व स्वर्गीय माणिकराव बाबर यांचा संस्थेला विसर पडला आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व त्यापासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा,म्हणूनच सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला या संस्थेस संस्थापक स्व.नारायणराव भगरे यांचे नांव तसेच कनिष्ठ महाविद्यालयास स्व.भाई जगन्नाथराव लिगाडे यांचे तर, माध्यमिक प्रशालेस स्व.माणिकराव बाबर यांचे नांव देण्यात यावे,अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे केली असून अशा आशयाचे डोंगरगाव आणि अकोला ग्रामपंचायतीचे ठरावही या मागणी सोबत दिल्याचे सांगण्यात आले.
—————————————————————————

स्व.गणपतराव देशमुख यांच्या नावानंतर नामांतराचा विषय चर्चेत :
                                     —————————————
                   सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,विज्ञान महाविद्यालयास स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे नांव देण्याची चर्चा गेल्या कांही दिवसांपासून सुरु आहे. असा निर्णय झाल्यास त्याचे आम्ही स्वागतच करु. मात्र,ज्यांनी संस्था स्थापन केली त्या स्व.नारायणराव भगरे व ज्यांनी ही संस्था नावारुपाला आणली ते स्व.भाई जगन्नाथराव लिगाडे व स्व.माणिकराव बाबर यांचाही या संस्थेने गौरव करावा आणि ज्या पद्धतीने स्व.माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या वारसांना संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम करण्याची संधी दिली आहे,त्याच न्यायाने स्व.नारायणराव भगरे,स्व.जगन्नाथराव लिगाडे व स्व. माणिकराव बाबर यांच्या वारसांनाही संधी मिळावी, असा सूर या निमीत्ताने समोर येऊ लागला आहे.
                              ————————————————

                    तुमची भावना संस्थेपर्यंत पोहचवू :
                              ————————————————

                   सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला अंतर्गत संस्थेला,ज्युनिअर कॉलेजला व हायस्कूलला नांव देण्याबाबत आपण संस्थेकडे लेखी स्वरुपात केलेली मागणी व त्यासोबत ग्रामपंचायतचे जोडलेले ठराव,या बाबी आपण संस्थेपर्यंत पोहोचवू आणि संस्थेच्या बैठकीत याबाबत चर्चा करून जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवू,अशी भूमिका यावेळी संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी मांडली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button