सांगोला :
नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आराध्य दैवत व सांगोल्याचे सुपूत्र श्री समनाथ महाराज यांची सुमारे ६०० वर्षापूर्वीपासून सांगोला येथे समाधी असून ती आजतागायत दुर्लक्षित राहिली आहे.नाथयोगी समनाथ महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी व इतर मागण्यांसाठी भटक्या व विमुक्त जाती संघाच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.
नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या या आंदोलनासाठी अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, मोहोळचे मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर,माजी उपनगराध्यक्ष प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश मंडले,बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे,भिमराज प्रतिष्ठानचे अँड.अक्षय दादा बनसोडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे सचिन सावंत,क्रांती ज्योती संघटनेचे विशाल गोडसे, लक्ष्मण शा.भोसले,करण पां.भोसले,गजेंद्र भोसले आदींनी सक्रिय सहभाग घेतला.नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सांगोला येथील समनाथ महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष विजयकुमार इंगोले, संतोष उ.इंगोले,मारुती शिंदे, संजय सि.जगताप,शहाजी वि.भोसले,गणेश न.इंगोले, तानाजी चौगुले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विविध मागण्या :
(१) नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आराध्य दैवत श्री समनाथ महाराज यांच्या सांगोला येथील वासुद रोडवरील पाण्याच्या टाकी शेजारील समाधी स्थळाचा जिर्णोध्दार करणे (२)श्री समनाथ महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे (३) जात- निहाय जनगणना करणे (४) गायरान जमिनी समाजास वहिवाटण्यासाठी पिकविण्यासाठी मिळाव्यात (५) सांगोला शहर व ग्रामीण भागात समाजासाठी घरकूल योजना राबविणे. (६) मरिआईवाला समाजास संजयनगर येथील जागा कायम करणे व घरकूल बांधून मिळणेबाबत.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने