सांगोला :
सांगोला येथील राजमाता क्रिकेट ॲकॅडमीची खेळाडू कु.मयुरी कदम हिची वरिष्ठ सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघात नुकतीच निवड झाली असून कोल्हापूर येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत.त्या स्पर्धेत सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी ती कोल्हापूरला रवाना झाली आहे.
मयुरी कदम हिच्या या निवडीबद्दल तिला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदा माने,सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे सदस्य उदय डोके सर व डॉ.अमर शेंडे यांनी शुभेछा दिल्या. तिला यासाठी राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर,रणजित गवळी सर,अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
राजमाता क्रिकेट अकॅडमीच्या मयुरी कदमची वरिष्ठ सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघात निवड
More Stories
शिवाजी पॉलिटेक्निकच्या संगणक विभागातील शुभम माने ९८.३५ टक्के गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम
विद्यार्थ्यांनी नेहमी उत्तम संस्कार जोपासण्याचा प्रयत्न करावा – आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे