सांगोला :
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे -पाटील यांच्या ४९ व्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात सर्वत्र मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील प्रतिष्ठानचे डॉ.पियुषदादा साळुंखे- पाटील यांनी दिली.
या शिबिराचे उदघाटन आज मंगळवार दि.२८ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,मांजरी येथे होणार असून मोबाईलचा अतिवापर तसेच वाढत्या वयाचा प्रभाव व अन्य कारणांनी तरुण व वयोवृद्ध नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आजाराविषयी समस्या वाढू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन सांगोला तालुक्यात डोळ्यांच्या आजाराने एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्या मंगळवार २८ रोजी मांजरी व परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,मांजरी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार २९ रोजी शिवणे परिसरातील नागरिकांसाठी मुक्ताई मंगल कार्यालय,शिवणे येथे तसेच नाझरे परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,नाझरे येथे या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. गुरुवार ३० रोजी अकोला व परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी सिद्धनाथ मंदिर,अकोला येथे शिबिर होणार आहे. तर, याच दिवशी महूद परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी अंबिका मंदिर, छत्रपती शिवाजी चौक,महूद येथे या शिबिराचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि.३१ मार्च रोजी जवळा आणि परिसरातील गावांसाठी कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय,जवळा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. याच दिवशी कोळा परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी लक्ष्मीदेवी मंदिर,कोळा येथे हे शिबिर आयोजित केले आहे. तर सोमवार दि.३ एप्रिल रोजी घेरडी परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी ग्रामपंचायत सभागृह,घेरडी येथे सदरचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.सर्वच ठिकाणी हे नेत्र तपासणी शिबिर सकाळी १० पासून सुरू होईल.
या शिबिरात सहभागी होणारे सर्व रुग्ण संपेपर्यंत सदरचे शिबिर सुरूच राहील. या शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांची नामांकित तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी होईल. शिबिरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांना त्याच दिवशी नॅब नेत्र रुग्णालय मिरज येथे नेण्यात येईल.शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची येण्या-जाण्याची तसेच राहण्याची व भोजनाची सुविधा संयोजकांच्या वतीने मोफत केली जाईल. तरी, सांगोला तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील प्रतिष्ठान, सांगोला यांच्या वतीने डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील, डॉ.विजय काशीद,डॉ.निलेश इंगवले,डॉ.राज मिसाळ, डॉ.शरद नागणे,डॉ.वैभव जांगळे व अनिलनाना खटकाळे यांनी केले आहे.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर