सांगोला :
शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेवून त्यांची सुरक्षितता आणि सन्मान वाढवण्यासाठी आम्ही कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो आहोत. एकाच कुटुंबात कायम एक हाती सत्ता ही लोकशाहीसाठी घातक आहे. ही घराणेशाहीची परंपरा मोडून काढत बाजार समितीचा पारदर्शी कारभार करुन बळीराजाला न्याय मिळवून देणार आहे.म्हणून ही निवडणूक महत्त्वाची असून निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरावे, विजय निश्चित आपलाच असेल,असा विश्वास व्यक्त करुन मागील ५० वर्षाच्या कार्यकाळात एक हाती सत्ता दिल्यानंतर स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी जो निर्णय घेतला, त्याला आजवर सांगोला तालुक्याने सन्मान दिला.आता त्यांचे नातू निर्णय घ्यायला लागले,तेही तालुक्याने मान्य करायचे का ? असा घणाघाती आरोप विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधी पक्षाच्या भावी नेतृत्वावर केला.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी शेकाप विरोधातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सोमवारी बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आम.शहाजीबापू पाटील हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके सर,ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,उद्योगपती भाऊसाहेब रुपनर,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर, डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील,युवा नेते सागर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील भोरे सर,भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी तात्या आलदर,दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आम.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, राज्यात इतर बाजारपेठेच्या तुलनेत नावाजलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीच्या निमित्ताने आलेल्या व्यापारी व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय,बाजार समितीच्या आवारात चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्यांची होणारी लूट, खरेदी-विक्रीच्या निमित्ताने आलेल्या शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांना लागणाऱ्या सर्व सुख सोयी निर्माण करून देण्यासाठी व सुरक्षित बाजार समितीचे स्वप्न साकार करण्यासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे मतदार कमी असला तरी,या निवडणुकीकडे गांभीर्याने व जबाबदारीने पाहून ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी जिंकायची आहे,त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे. भविष्यात सांगोला कृषी उत्पन्न समिती ही एक आदर्शवत संस्था बनेल,यासाठी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत,असे आम. शहाजीबापू पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,सर्वच कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आपण ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावनांचा विचार करूनच आम्ही व्यासपीठावरील मंडळी निर्णय घेणार आहोत.तुमच्या मनात जे आहे तेच, उद्याच्या निवडणुकीत होईल,असा विश्वास देत, विधानसभेच्या निवडणुकीपासून तालुक्यातील परिस्थिती ही वेगळीच निर्माण झाली आहे. तालुक्यात जे घडलं तेच राज्यात देखील घडलं,सरकार बदलल्यानंतर सांगोला तालुक्याचं कसं ?असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी तर्क-वितर्क व्यक्त केले.परंतु तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचेच कार्य आम्ही केले आहे.स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आम्हा सर्वांना सहानुभूती होती. त्यामुळे सूतगिरणी,सोसायटी,खरेदी-विक्री संघ या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले.त्यांच्या विनंतीला मान दिला.परंतु याचा अर्थ त्यांनी वेगळा काढत, गांवगाड्याच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले.म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून त्याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा आदर करून कार्यकर्त्यांना जे पाहिजे तेच राजकारणात घडेल असे सांगत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देत, बाजार समितीच्या माध्यमातून बळीराजाचे हित जोपासले जाईल तसेच सोलापूर जिल्ह्यात आणि सबंध राज्यात एक आदर्शवादी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करु,असा विश्वास दिपकआबा यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,पी.सी.झपके सर,तानाजी काका पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार,शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर,माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर,संभाजीतात्या आलदर यांनी आपले विचार व्यक्त केले. तर उपस्थितांमधून देखील कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली.या विचार विनिमय बैठकीसाठी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे,युवा नेते योगेशदादा खटकाळे,मा.नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे,मा.नगरसेवक सचिन लोखंडे,सोमेश यावलकर, कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण,माजी सरपंच अभिजीत नलवडे,माजी पं.स.सदस्य सुभाष इंगवले,विजयदादा पवार,सतीश काशीद-पाटील,वि.का.से. सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे सर,युवा नेते गणेश कांबळे, माजी सरपंच दिलीप मोटे,आनंद काका घोंगडे, उद्योगपती बाळासाहेब आसबे,भाजपाचे संभाजी फाटे, घेरडीचे माजी सरपंच कय्युम आत्तार, मा.उपसरपंच सुनिल पाटील (गायकवाड) व अनिल दिघे,विनायक मिसाळ,युवा नेते विजय केदार,माजी उपसरपंच चंद्रकांत चौगुले,प्रकाश सोळसे,प्रशांत साळुंखे,फिरोज मणेरी,डॉ.धनंजय पवार,राम बाबर, दामोदर वाघमारे,संतोष पाटील, अशोक शिनगारे, अमृत उबाळे,गणेश कदम,साहील इनामदार,सतीश जगदाळे,विष्णू साळुंखे,दत्तात्रय साळुंखे,राहुल शिनगारे यांच्यासह सांगोला तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,संचालक,विविध ग्रा.पं.चे सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक