आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला देणगीदारांचा मोठा हातभार

महिनाभरात हजारो रुपयांचा निधी जमा

सांगोला :

सामाजिक बांधिलकी जपण्यात आणि लोकोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ‘आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला’ या नोंदणीकृत संस्थेला देणगीदारांकडून मोठा पाठिंबा मिळत असून ३१ मे ते ३० जून २०२६ या अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत संस्थेला देणगी स्वरुपात एकूण ३५,९६५/- रुपये निधी प्राप्त झाला आहे.केवळ आर्थिक मदतच नव्हेतर, समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य आणि २ नवीन,२४ जुन्या सायकल देखील देणगी म्हणून दिल्या आहेत.गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे.

देणगीदारांमध्ये – प्रा.कमलाकर महामुनी (१००१/-),वसंत माने सर (१०५३/-),प्रदीप गौतम बनसोडे (२०००/-), सूर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा अनिलभाऊ इंगवले (११,०००/-),अनामिक (१०००/-),न्या.तेजवंत सिंघ संधू साहेब (५१००/-),अनामिक (१०००/-),अनामिक (११००/-),मन्मथ उर्फ राजेंद्र बिरगे (५००१/-), श्रीकांतकाका देशपांडे (११००/-),कुमार मनोहर कांबळे (५००/-),अमोल बाबर (११००/-),प्रा.महादेव उपलाने सर,कोल्हापूर (५०१०/-) अशी देणगी मिळाली.

त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य देणगी देणाऱ्यांमध्ये राकेश ढाणके,स्वरुप अजय अरबळी,हातीद येथील मंडळ अधिकारी राजकुमार बनसोडे,विलास नलवडे गुरुजी, समाजसेवक बापूसाहेब ठोकळे,रविंद खंडागळे,काकासाहेब चन्ने यांचा समावेश आहे.तर,सूर्योदय अर्बन बँकेचे जनरल मॅनेजर अण्णासो इंगवले यांनी २ नवीन सायकल भेट दिल्या.कै.पोपट सदाशिव नलावडे यांच्या स्मरणार्थ आकाश नलावडे यांच्याकडून रुग्णांच्या सेवेसाठी १ हॉस्पीटल बेड भेट मिळाला आहे.त्याचबरोबर, जुन्या २४ सायकल देणगीदारांनी दिल्या असून त्या दुरुस्त करुन गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या जात आहेत.
                       =========================

प्रतिष्ठानकडून सर्व देणगीदारांचे आभार :

संस्थेला मिळालेल्या या भरघोस मदतीनंतर,’आपुलकी प्रतिष्ठान’ ने सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.”तुमच्या याच पाठिंब्यामुळे व सहकार्यामुळे आम्हाला सामाजिक कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते,” अशा भावना प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.
                       =========================

सहकार्यासाठी आवाहन :

‘जाणीव सामाजिक बांधिलकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठानने नागरिकांना आगामी काळातही अशीच यथाशक्ती देणगी देऊन सहकार्य करत राहण्याचे आवाहन केले आहे.मदत करण्यासाठी संपर्क/फोन पे नंबर-9011707080.
==========================