सांगोला :
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यामधील कौशल्याला आणि कल्पकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणून स्व.भाई गणपतरावजी देशमुख विचारमंच आयोजित क्रांतीनाना मळेगांवकर प्रस्तुत “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” तसेच रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा यासह कौटुंबिक असा पाच फुटाचा बच्चन इ.कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
स्व.माजी मंत्री भाई गणपतरावजी देशमुख विचार मंच आयोजित महिला दिन सप्ताहानिमित्त क्रांतीनाना मेळगांवकर प्रस्तुत “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम येत्या गुरुवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड जवळील अनमोल आईस्क्रीम पार्लरसमोर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ सांगोला-वासूद रोडवरील हॅप्पी पार्क चौपाटी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.निकिताताई देशमुख या बोलत होत्या.या पत्रकार परिषदेसाठी माजी उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर, सीताताई ढोबळे,अंजू माने, माधुरी जाधव,विद्या जाधव, शितल लवटे,शितल वाघमोडे,स्वाती नकाते,नेहा जवंजाळ, सुप्रिया होनराव आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महिलांमधील कला व गुणांना वाव मिळावा,या उद्देशाने सुरु केलेल्या या महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने १६ मार्च रोजी आयोजित विवीध कार्यक्रमांच्या नियोजनार्थ जय्यत तयारी सुरु असून,या स्पर्धेत बक्षीसे देखील ठेवण्यात आली आहेत.प्रत्येक स्पर्धेसाठी पाच बक्षीसे असून यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी टीव्ही व पैठणी, तृतीय क्रमांकासाठी मिक्सर व पैठणी,चतुर्थ क्रमांकासाठी गॅस शेगडी व पैठणी आणि पाचव्या क्रमांका साठी गिफ्ट व पैठणी अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. लकी ड्रॉ मार्फत १०० बक्षीसे वितरित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी १६ तारखेला कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत नांव नोंदणी सुरु असणार आहे. त्याचबरोबर,रविवारी १९ मार्च रोजी स.१० ते दु.१ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा व दु.१ ते ३ वाजेपर्यंत वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहेत. सदरच्या स्पर्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे पार पडणार आहेत. यासह सायं.६ वाजता ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यातील एक पात्री “असे पाच फुटाचा बच्चन” हे कौटुंबिक,कॉमेडी नाटक सादर केले जाणार आहे,अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
—————————————————————————
महिलांना व्यासपीठ उभा करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न :
प्रगत समाजात पुरुषांच्या बरोबरीने मुली-महिला या सक्षम झाल्या असून जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत आहेत.घरगृहस्थीच्या जबाबदाऱ्या सांभाळत नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रातही यश मिळवत आहेत.परंतू,मुली व महिला यांचे मधील निरनिराळ्या कलांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. सदर बाब नजरेसमोर ठेवून महिलांना एक व्यासपीठ उभा करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान व्हावा आणि महिलांचे मनोरंजन व्हावे,या माध्यमातून महिलांमधील कला व गुणांना वाव मिळावा,या उद्देशाने सुरु केलेल्या या महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने १६ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यातील मुली व महिलांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. – डॉ.निकिताताई देशमुख
—————————————————————————
More Stories
सांगोल्यात ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा
सांगोला महिला शहर राष्ट्रवादीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
आम.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कोळा येथे मोठ्या जल्लोषात पार पडला बैलगाडी शर्यतीचा थरार