माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व डॉ.केळकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

सांगोला :

          माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने केळकर हॉस्पिटल मध्ये ‘स्तनाचा कॅन्सर टाळावा’ यासाठी नुकतेच मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

प्रारंभी,डॉ.रणजीत केळकर यांनी पाहुण्यांना फुलझाड देऊन स्वागत केल्यानंतर दीपप्रज्वलन करुन शिबीरास सुरुवात करण्यात आली.सदर शिबीरासाठी कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटलमधील प्रसिध्द सर्जन डॉ.संगीता काटे- निंबाळकर यांनी सहकार्य केले. यासमयी,डॉ.संगीता काटे-निंबाळकर यांनी उपस्थित महिलांसमोर, कॅन्सर बाबत महिलांमध्ये असलेली भीती, स्वतःच स्वतःची तपासणी कशी करावी ?, कॅन्सर वरील आधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शंकांचे निरसनही केले.

सदर शिबिरात एकूण ८५ महिलांची तपासणी करण्यात आली.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, उपाध्यक्षा माधवी देशपांडे, खजिनदार डॉ.शालिनी कुलकर्णी, आरोग्य विभाग प्रमुख डॉ.केतकी देशपांडे व डॉ.सुपर्णा केळकर इ.उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते व केळकर हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————————————————