सांगोल्यात ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा
सांगोला :
सांगोला नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचे चिरंजीव ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसा निमित्त नगराध्यक्ष चषक-२०२३,सांगोला तालुका मर्यादित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता विवीध मान्यवारांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा सांगोला येथील क्रीडा संकुल येथे होणार आहेत.
ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आम.शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर,पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डाॅ.बाबासाहेब देशमुख व माजी नगराध्यक्ष प्रा.पी. सी.झपके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या उदघाटन समारंभास माजी नगराध्यक्ष रफीकभाई नदाफ,माजी नगराध्यक्षा राणीताई माने,माजी जि.प.सदस्य अतुल पवार,माजी पं.स.सदस्य दादासाहेब लवटे,माजी नगरसेवक सर्वश्री प्रशांत (पप्पू) धनवजीर,आस्मीर तांबोळी,माऊली तेली, अँड.गजानन भाकरे,संजय देशमुख सर,माजी नगरसेविका छायाताई मेटकरी व अप्सराताई ठोकळे, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप (बनू) जानकर,धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ता (भाऊ) जानकर तसेच काशिलिंग (बाबू) गावडे व नवनाथ शिंगाडेआदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांनी दिली.
या स्पर्धेसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंदाभाऊ गोरख माने यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच गावडे पेट्रोलियम व गावडे उद्योग समूहाचे मालक प्रशांत गावडे आणि राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हणमंत (दादा) चव्हाण यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे १ लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष काशिलिंग (बाबू) गावडे व माने ऑटोमोबाईल्सचे मालक सागर विजय माने व इंजि.दिनेश येडगे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.त्याचबरोबर, माजी नगरसेवक सिध्देश्वर (नाथा) जाधव व युवा सेना तालुका अध्यक्ष दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
तसेच गणेश मोबाईल शॉपीतर्फे कै.सुभाष (आप्पा) लिंगे यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात येणार आहे. अण्णासो मारुती गडदे यांच्यातर्फे मालिकावीरास वाशिंग मशीन देण्यात येणार आहे. धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर यांच्याकडून बाॅल देण्यात येणार आहे. प्रत्येक सामना सामनावीरास उल्हास मेटकरी यांचेकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.रॉयल स्पोर्टचे भारत शिंदे यांच्यातर्फे क्वाॅर्टर फायनलपासून मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट देण्यात येणार आहेत.
तसेच राज कोकरे यांच्याकडून सलग ४ षटकारासाठी स्पोर्ट्स किट व बॅट देण्यात येणार आहे.तर,सलग ४ चौकारासाठी समाधान नरुटे यांच्याकडून स्पोर्ट्स किट व बॅट देण्यात येणार आहे. सलग ३ विकेट साठी विजय माने यांच्याकडून स्पोर्ट शूज देण्यात येणार आहेत.सर्वाधिक धावा घेणाऱ्या स्पर्धकासाठी गणेश भोसले यांच्याकडून बॅट देण्यात येणार आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या स्पर्धकासाठी राजनंदिनी स्पोर्टस, सांगोला यांच्याकडून किट व सॅक देण्यात येणार आहे.या क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक संस्था व मान्यवरांकडून विशेष अर्थसहाय्य करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन देवा स्पोर्ट्स व राजमाता प्रतिष्ठान,सांगोला यांचेवतीने करण्यात आले आहे.
—————————————————————————