सांगोला महिला शहर राष्ट्रवादीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
सांगोला :
सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व सांगोला विधानसभा मतदार संघाच्या महिला अध्यक्षा सुचिताकाकी मस्के यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कु.कृष्णाई दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते व कु.सृष्टी खरात यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रारंभी कु.कृष्णाई साळुंखे-पाटील यांचा सत्कार सुचीताकाकी मस्के यांच्या हस्ते तर,सृष्टी खरात यांचा सत्कार स्वाती प्रताप मस्के व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांचा सत्कार उद्योगपती दिलीप मस्के यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी,प्रास्ताविक संगीता पाखरे यांनी केले.
या स्पर्धेत शिवानी विनय कांबळे यांनी प्रथम क्रमांकाचे रु.११ हजार ६०१,रेश्मा प्रशांत दिवटे यांनी व्दितीय क्रमांकाचे रु.८ हजार ६०१, शुभांगी संजय पतंगे यांनी तृतीय क्रमांकाचे रु.६ हजार ६०१ व शिल्पा सतिश वाघ यांनी उत्तेजनार्थ ३ हजार ६०१ रुपयाचे पारितोषिक पटकावले.यावेळी ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या जीवन कार्याचा गौरी सजावटी द्वारे संदेश देणाऱ्या मीनाक्षी वेळापुरे यांनाही रु.२ हजार ६०१ रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व विजेत्या स्पर्धकांना ह.भ.प.स्व. शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक देण्यात येवून स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना आकर्षक साडी भेट देण्यात आली. सदरची सर्व बक्षिसे कै.रामचंद्र आबा मस्के व कै. सीताबाई रामचंद्र मस्के यांच्या स्मरणार्थ दिलीपकाका मस्के यांच्यावतीने देण्यात आली आहेत . यावेळी स्पर्धेत सुमारे ६७ महिलांनी सहभाग नोंदविला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी थोरात मॅडम यांनी केले व आभार सुचिताकाकी मस्के यांनी मानले.
—————————————————————————