मनोरंजन

आम.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कोळा येथे मोठ्या जल्लोषात पार पडला बैलगाडी शर्यतीचा थरार

सांगोला :

                     सांगोल्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या सन्मानार्थ सांगोला तालुक्यातील कोळे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी हलगीच्या तालावर,फटाक्याची आतिषबाजी व भंडार्‍याची मुक्त उधळण करीत बैलगाडी शर्यतीचा थरार मोठ्या जल्लोषात पार पडला.

       सांगोला तालुक्यातील कोळे येथे पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीवेळी सत्कारमूर्ती आमदार शहाजीबापू पाटील,खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,उद्योपती भाऊसाहेब रुपनर,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,जेष्ठ नेते संभाजी आलदर,युवा नेते सागर पाटील व गुंडा खटकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. हा बैलगाडी शर्यतीचा थरार ‘याची डोळा,याची देही’ पाहण्यासाठी परिसरातील आबाल वृद्धांसह,ग्रामस्थ व बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

या बैलगाडी शर्यतीसाठी शेजारच्या कर्नाटक राज्यासह पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६५ बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते.या शर्यतीच्या स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी सत्कारमूर्ती आमदार शहाजीबापू‌ पाटील,खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येवून ग्रामस्थांनी जेसीबीमधून तब्बल १० टन झेंडू फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी, कोळे ग्रामस्थांच्या वतीने केक कापून, आमदार शहाजीबापू पाटील यांचा फेटा बांधून, शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून तसेच श्रीविठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी, संभाजी तात्या आलदर,सरपंच पती हरिभाऊ सरगर,माजी जि.प.सदस्य अतुल पवार,कोळा अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर,माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, माजी सरपंच अभिजीत नलवडे,सांगलीचे संजय हजारे,श्रीमंत सरगर,बिरापंच आलदर,उद्योजक किरण पांढरे,माजी सरपंच शहाजी हातेकर,माजी उपसरपंच शिवाजी घेरडे,भैय्यासाहेब बंडगर,संजय मेटकरी,शंकर तोडकरी,रामचंद्र आलदर,विलास व्हनमाने, काकासाहेब नरळे,बाळासाहेब कोळेकर,अंकुश आलदर,धनंजय काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यासमयी, विजेत्या बैलगाडी स्पर्धकांना रोख स्वरुपात सुमारे ५ लाख रुपयांची बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला.सदर बैलगाडी शर्यत स्पर्धेसाठी कोळे ग्रामस्थांसह रावसाहेब आलदर,पंढरी आलदर,सय्याप्पा सरगर,गंगाराम सरगर,चोरमुले टेलर आदींनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अशोक आलदर यांनी केले तर,आभार निलेश मदने सर यांनी मानले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button