आम.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळ्यात रंगणार बैलगाडी शर्यतीचा थरार
सांगोला :
सांगोल्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा येथे बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार असून सांगोला तालुक्यातील कोळे येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने रेडामाई मंदिर, शेटफळे रोड,कोळे येथे मंगळवार दि.१७ रोजी सकाळी १० वाजता भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैलगाडी शर्यतीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, सत्कारमूर्ती आमदार शहाजीबापू पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे.
या बैलगाडी शर्यतीसाठी भव्य बक्षीसे देण्यात येणार असून या बक्षीसांची रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
* जनरल अ गट :
प्रथम १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये तर, तृतीय ५१ हजार रुपये.
* जनरल ब गट :
प्रथम ५१ हजार रुपये,द्वितीय ३१ हजार रुपये तर, तृतीय २१ हजार रुपये. * आदत गट : प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये तर, तृतीय ५ हजार रुपये.
याप्रमाणे विजेत्या बैलगाडी स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बैलगाडी शर्यतीसाठी बैलगाडी मालकाचे फोटो,आधार कार्ड झेरॉक्स व दोन बैलाचे फोटो संयोजकांकडे जमा करावेत,असे आवाहन पंढरी आलदर,सयाप्पा सरगर,गंगाराम पुजारी,दत्ता सरगर,सचिन चोरमुले, दत्ता आलदर आदींनी केले आहे.
—————————————————————————