आरोग्य

सांगोल्यात दिंडीच्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न

 

सांगोला :

कार्तिकी एकादशी निमित्त सांगोला येथे आलेल्या बेळगाव येथील दिंडीच्या सर्व वारकऱ्यांची युगांत हॉस्पिटलच्या वतीने जनरल सर्जन डॉ.अमित मेटकरी यांनी मोफत आरोग्य तपासणी करुन योग्य तो औषधोपचार केला.

सांगोला शहरातील जुना मेडशिंगी रोडवरील खडतरे वस्ती येथे ऋषिकेश आप्पा खडतरे यांच्या घरी परंपरेने दरवर्षीप्रमाणे आलेल्या मुक्कामी दिंडीच्या सुमारे १०० वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यात येवून त्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना योग्य तो औषधोपचार करण्यात आला.

याप्रसंगी,सांगोला शहरातील जांगळे वस्ती,खडतरे वस्ती व मोरे वस्ती येथील नागरिकांनी डॉ.अमित मेटकरी यांचे कौतुक व अभिनंदन केले.तर,खडतरे कुटुंबीयांच्या वतीने माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सेवानिवृत्त शिक्षक जयसिंग खडतरे,डॉ.जगताप,  ऋषिकेश खडतरे,ऋतुराज खडतरे,बापू खडतरे,अण्णा खडतरे,पंडित वाघमारे व गजानन वाघमारे आदींनी डॉ.अमित मेटकरी यांचा सत्कार केला.
—————————————————————————

मुस्लीम बांधवाकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा :

वारकर्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचा हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ओन्ली वेल्डिंग वर्क्सचे मालक इमरान तांबोळी हे मुस्लिम असूनही त्यांनी विशेष परिश्रम घेऊन व वारकऱ्यांची मनोभावे सेवा करुन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button