मनोरंजन

केजीएफलाही मागे टाकणार्‍या “कांतारा” चित्रपटाची पंतप्रधान मोदींनाही पडली भुरळ

 

 

बाॅलिवूड विश्व :

अंगावर रोमांच आणणारा तसेच कोणताही सुप्रसिध्द व दिग्गज अभिनेता नसताना “कांतारा” हा चित्रपट नुसता सुपरहिट्च ठरला नाहीतर,कमाईच्या बाबतीतही “केजीएफ” ला मागे टाकून या चित्रपटाने बाॅलिवूड विश्वात एक इतिहास रचला आहे. “केजीएफ” लाही मागे टाकणार्‍या “कांतारा” चित्रपटाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भुरळ पडली असून ते स्वत: हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. तर,”कांतारा” पाहताना माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला,असा ट्विट करुन सुपरस्टार रजनीकांतने रिषभ शेट्टीचे तोंडभरुन कौतुकही केले आहे.

“कांतारा” चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा असून प्रेक्षकांबरोबरच चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांतसह इतर दिग्गज सेलिब्रेटींनीही या चित्रपटाची प्रशंसा करत रिषभ शेट्टीचे तोंडभरुन कौतुकही केले आहे.”अंगावर शहारे आणणारा आणि रोमांच निर्माण करणारा, असा विषय इतक्या प्रभावीपणे आजवर कुठल्याही चित्रपटात मांडला गेला नसून लेखक,दिग्दर्शक व अभिनेता म्हणून रिषभ शेट्टीला सलाम तसेच चित्रपटसृष्टीतील या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कलाकार व टीमचे अभिंनदन !” असे रजनीकांतने केलेले ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे.

कोणताही दिग्गज अभिनेता नसताना “कांतारा” हा चित्रपट सुपरहिट् ठरला असून प्रेक्षक व सेलिब्रेटींकडून केवळ प्रशंसाच मिळवतोयं असे नव्हेतर, कमाईच्या बाबतीतही “केजीएफ” ला मागे टाकून या चित्रपटाने एक इतिहास रचला असल्याचे दिसून येत आहे.

—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button