नवी दिल्ली :
२१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया हे सर्वात मोठे कनेक्टिंग प्लॅटफॉर्म बनले असून सोशल मीडिया अलिकडे दररोज कांही ना कांही सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे अपडेट घेऊन येत असते.त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ही मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयटी रुल्समध्ये (नियमांमध्ये) मोठे बदल केले आहेत. या नवीन आयटी नियमानंतर ट्विटर,फेसबुक,इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारतातील नवीन आयटी नियम अनिवार्य होणार आहेत. त्यामुळे आता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अल्गोरिदमच्या नावाखाली कांहीही अपडेट करता येणार नाही.
सरकारने जारी केलेले नवीन सोशल मीडिया आयटी रुल्स :
* नवीन आयटी नियमांच्या नोटिफिकेशनसाठी ९० दिवसात अपेलेट पॅनल तयार करण्यात येणार आहे. या नवीन बदलाअंतर्गत संवेदनशील कंटेंटवर आता २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल.
* सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार, सोशल मीडिया कंपनींना त्यांच्या सेवा नियम आणि गोपनीयतेबद्दल अधिक माहिती मोबाईल ॲप्लिकेशनसह वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून द्यावी लागेल.
* सोशल मीडिया कंपन्यांना आता भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरी हक्कांचा आदर करणे अनिवार्य आहे. कंपनीबद्दल कुठल्याही तक्रारीच्या निवारणासाठी ७२ तासांचा अवधी दिला जाईल. त्याचबरोबर मजकूर काढून टाकण्यासाठी कंपनीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७२ तासांच्या आत कारवाई केली जाईल.
* नवीन नियमानुसार कोणत्याही तक्रारीवर कंपनीला पंधरा दिवसांच्या आत ॲक्शन घेणे अनिवार्य आहे. या नवीन आयटी नियमांमध्ये वापरकर्त्यांच्या अधिकारांबाबत काळजी घेऊन नियम निश्चित करण्यात आले आहेत. नवीन नियमावलीनुसार,सर्व टेक कंपन्यांना भारतीय संविधानाचे पालन करावेच लागणार आहे. त्याचबरोबर युजरच्या तक्रारींची दखल २४ तासाच्या आत घेणे अनिवार्य आहे. शिवाय यासाठी शासन आपली नवीन समिती देखील स्थापन करणार आहे. या समितीमध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने