महत्वाच्या बातम्या

हंगिरगे येथे एलकेपी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

 

 

सांगोला :

                           सांगोला तालुक्याच्या बाँड्रीवर अगदी टोकाला वसलेल्या सांगोला तालुक्यातील हंगीरगे येथे एलकेपी “मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी” या संस्थेचा लोकार्पण सोहळा तालुक्याचे लोकप्रिय आम.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते तर, राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, सूर्योदय उद्योग समूहाने सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये उभ्या केलेल्या विवीध उद्योगधंद्यांमधून शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळाले असून सूर्योदय उद्योग समुहाच्या माध्यमातून नवनवीन उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणार्‍या या तरुणांचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज असून संस्थापक अनिल इंगवले यांचा बँकिंग आणि उद्योग क्षेत्रामधील आजवरचा थक्क करणारा हा प्रवास समाजातील सर्व तरुणांकरिता प्रेरणादायी आहे. सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील कांही शासकीय व सहकारी वित्तीय संस्था अडचणीतून जात असताना, जिथे आर्थिक सोईसुविधा उपलब्ध नाहीत, छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी ज्या ग्रामस्थांना दूर जावे लागत होते, अशा ग्रामीण भागातून नव्या उमेदीने व विशिष्ट ध्येयाने एलकेपी मल्टीस्टेट सारखी संस्था आर्थिक सेवा सुविधा देण्याकरिता पुढे सरसावलेली आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आम.शहाजीबापू यांनी केले.

यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले तसेच त्यांचे जोडीदार भगत गुरुजी,बंडोपंत लवटे व दिघे गुरुजी यांचे कामाची खूप मोठी धडाडी असून समाजातील नेमकी गरज ओळखून कितीतरी व्यवसाय व उद्योगधंदे आजवर त्यांनी उभे केलेले आहेत. तीन तालुक्याच्या सीमेवर असलेले हंगिरगे हे तालुक्यापासून खूप दूर अंतरावरचे गांव असून अशा प्रकारच्या वित्तीय संस्थेची याठिकाणी खूप मोठी गरज होती. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा ओळखून आपण काम करत आहात, ही बाब प्रशंसनीय आहे. हे गांव आणि आजूबाजूच्या पाच-दहा गांवातील व्यावसायिकांना आपण माफक दरात कर्ज पुरवठा करुन या भागातील उद्योग आणि व्यवसायाला उभारी द्यावी,असा सल्लादेखील दीपकआबा यांनी यावेळी दिला. उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यावेळी बोलताना म्हणाले की, एलकेपी मल्टीस्टेटने स्वच्छ व पारदर्शी कारभार करत ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देण्याची काळजी घ्यावी,अशी सूचना देवून संस्थेच्या होत असलेल्या प्रगतीला आणि शाखा विस्ताराला भाऊसाहेब रुपनर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी या भागात मल्टीस्टेटची शाखा उभारण्यापाठीमागील भूमिका विशद केली व संस्थेविषयी सखोल माहिती आणि संस्थेमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी सुविधा यांची माहिती सांगत ठेवीच्या विविध प्रकारच्या योजनाबद्दल माहिती दिली. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते किसन आबा गायकवाड, हंगिरगेचे सरपंच साबळे, माजी जि.प.सदस्य अनिल भाऊ मोटे,घेरडीचे सरपंच पिंटू पुकळे, रासपचे नेते सोमा आबा मोटे, दिलीप मोटे,उद्योजक संजय साळुंखे,महादेव दिघे,बिभीषण सावंत,बाबुराव वाघ,मधुकर कोळेकर,सदाशिव सावंत,दादासाहेब सावंत,बंडू साबळे, श्रीकृष्ण काटे, आबासो काटे,रामभाऊ पुकळे, दादासो सावंत,वसंत सावंत,सुभाष सावंत,दिलीप सावंत,विनायक कुलकर्णी सर,डॉ.सुशीलकुमार शिंदे,अशोक सावंत, डॉ. सचिन काळे, सुरेश काटे सर,बिराजी, श्रीनिवास दादा करे,अमोघसिद्ध कोळी, चंद्रकांत करांडे,कोमल सातपुते, कांचन चव्हाण,दत्तात्रय मळगे, विजयकुमार पोरे,सर्जेराव वाघ, विलास पावणे,बाबुराव पुकळे,दीपक बंदरे साहेब, रामचंद्र लांडगे,अशोक चोरमले,हरीबा गावडे,नितीन सावंत, पोपट गुजले,अशोक गावडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी,उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत यांनी मानले. गांवातील मुख्य बाजारपेठेमध्ये पुरेशी इमारत, त्यामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक फर्निचर, कार्यक्रमासाठी आकर्षक स्टेज, हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी,ड्रोन कॅमेराचे चित्रण,महिला वर्ग, युवक वर्ग, ज्येष्ठ मंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची मोठी उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला असून अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेली तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली संस्था या भागात उभारल्यामुळे परिसरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button