महत्वाच्या बातम्या

सांगोला सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यात अखेर शेकापला यश

 

सांगोला :

                               महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली देशपातळीवर नावाजलेल्या सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक ही त्यांच्या हयातीनंतरही बिनविरोध करण्यात अखेर शेकापला यश मिळाले आहे.

सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या स्थापनेपासूनच सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यात स्व.गणपतराव देशमुख यांना कायम यश मिळाले. परंतु, त्यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होणार ? की निवडणूक लागणार ? याची सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि सभासदांसह सांगोला तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील लोकांना उत्सुकता लागून राहिली होती.परंतु,अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना यश मिळाले आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनीही आढेवेढे न घेता सहकार्य करण्याची भूमिका ठेवल्याने सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करणे शक्य झाले. यासाठी,शेकापचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख, डाॅ.बाबासाहेब देशमुख,पक्षाचे चिटणीस दादाशेठ बाबर,माजी नगराध्यक्ष मारुती (आबा) बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, प्रा.विठ्ठलराव‌ शिंदे यांचेसह शेकापच्या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेवून सूतगिरणीच्या बिनविरोध निवडणूकीची परंपरा पुढे कायम ठेवली, त्यामुळे शेकापच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button