सांगोला :
सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी व केसकरवस्ती शाळेत विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी,विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केसकरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,विद्यार्थ्यांमधून परी डुबुले,सिद्धार्थ गोसावी,दक्ष घाडगे,शिवतेज वाघमोडे,माऊली सावंत,सैफ शेख,रोजिया शेख,विराज खबाले या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली.
यासमयी,सिद्धार्थ गोसावी,दक्ष घाडगे व शिवतेज वाघमोडे या विद्यार्थ्यांनी विश्वरत्न बाबासाहेबांची वेशभूषा साकारली होती.उमेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सांगितले.तर,वंदना पाटणे यांनी महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील दोन-तीन प्रसंगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश महाजन यांनी केले.तर,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना पाटणे यांनी केले.जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी एक तास सलग सामूहिक वाचन उपक्रमात सहभाग घेतला.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न