सांगोला :
श्री सत्यसाई सेवा संघटना,महाराष्ट्र राज्य (शाखा-पंढरपूर) यांचे वतीने सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावच्या एसटी स्टँडसमोर पाणपोईचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी श्री सत्यसाई सेवा संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर (वॉटर प्रोजेक्ट इन्चार्ज, मुंबई), संपतराव वाघाटे (पंढरपूर), डाॅ.प्रकाश जडल (सोलापूर),या संघटनेचे सेवाभावी कार्यकर्ते श्रीनिवास येमुल,दत्तात्रय सिध्दम,बालाजी परमेल (सोलापूर) इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या पाणपोईचे उदघाटन चंद्रशेखर (मुंबई) व मेडशिंगीचे सरपंच प्रतापसिंह इंगवले यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मेडशिंगी गावचे माजी सरपंच जालिंदर माने,संतोष पाटील,मिलिंद वेदपाठक,विनायक नष्टे,प्रशांत झाडबुके,सुनील इंगवले ,प्रशांत पाटील,समाधान कसबे,गणेश पाटील,तानाजी अळतेकर,सुनील इंगवले व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वरअण्णा झाडबुके यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
उन्हाळा संपेपर्यंत पाणपोई सुरु राहणार :
यावर्षी उन्हाळा कडक असून तहानेने व्याकुळ झालेल्या मेडशिंगी गावातील ग्रामस्थांसह बाहेरुन येणार्या-जाणार्या नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय व्हावी,या उदात्त हेतूने ही पाणपोई सुरु करण्यात आली असून जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत म्हणजेच संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत ही पाणपोई सुरु राहणार. – चंद्रशेखर (इन्चार्ज वाॅटर प्रोजेक्ट,मुंबई)
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली