शैक्षणिक

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात “स्त्री-पुरुष समानता” कार्यक्रम संपन्न

सांगोला :

                       सांगोला येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात पंढरपूरच्या ॲड.सुकेशनी बागल (शिर्के) यांच्या प्रमुख उपस्थितीत व संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.हणमंत कोळवले यांच्या अध्यक्षतेखाली जेंडर सेंसिटायझेशन या समिती मार्फत “स्त्री-पुरुष समानता” हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करुन करण्यात आली.यावेळी,प्रमुख पाहुण्या ॲड.सुकेशनी बागल(शिर्के) यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्त्री-पुरुष समानतेबाबत मार्गदर्शन करुन जागृत केले.याचवेळी स्त्रियांबद्दल व पुरुषांबद्दल त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असलेले सर्व कायदे माहीत करुन दिले. विद्यार्थीनींना व विद्यार्थ्यांना हे कायदे लक्षात राहण्यासाठी त्यांनी एका गीताचा वापर केला व त्या गीताद्वारे त्यांनी त्या कायद्यांचा योग्य वापर कसा व कधी करावा ? असे देखील स्पष्ट केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.हणमंत कोळवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या काळामध्ये स्त्री-पुरुष समानतेची समाजाला खूप गरज आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी सूर्यवंशी यांनी केले तर, आभार प्रदर्शन प्रा.प्रणाली माळी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीच्या चेअरमन प्रा.अश्विनी सूर्यवंशी, समिती सदस्या प्रा.दिपाली गोडसे, प्रा.मीनाक्षी धुरे व संगणकशास्त्र विभागातील सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button