आरोग्य

सांगोल्यात केदार हॉस्पिटलमध्ये मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबीर पंधरवडा

सांगोला :

सांगोला शहरातील केदार हॉस्पिटलमध्ये १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबीर पंधरवडा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डाॅ.निरंजन केदार यांनी दिली.

                                   या मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबीरासाठी कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट व लेझर अँनोरेक्टल सर्जन डॉ.आदित्य पवार (एम.एस. सर्जरी) यांच्यामार्फत मूळव्याध,भगेंदर,फिशर,गुदाचा कर्करोग (कॅन्सर) अशा आजाराच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

          शौचाच्या वेळी रक्त पडणे,शौचाच्या जागी वेदना होणे, कोंब असणे,पोट साफ न होणे,भूक न लागणे, गुदद्वाराजवळील फोडामध्ये वेदना होणे इत्यादी प्रकारची कसलीही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.विना चिरफाड मूळव्याध वरील इंजेक्शन थेरपी उपलब्ध असून सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील रुग्णांनी १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केदार हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button