सांगोला :
पंढरपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट सब ज्युनिअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप-२०२५ या राज्यस्तरीय बाल मैदानी क्रीडा स्पर्धेत सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करत आपल्या मेहनतीची चुणूक दाखवली.तर,या स्पर्धेत हर्षिता संदीप कोळवले हिने ८ वर्ष वयोगटातून “स्टॅंडिंग ब्रॉड जंप” मध्ये महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावून स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव स्कूलमधून ५ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.त्यामधून हर्षिता कोळवले हिने जिद्द,मेहनत व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर वरीलप्रमाणे उत्तुंग यश संपादन केले.
या यशासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष शिवाजी लाडे सर,मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न