पालकमंत्री जयकुमार गोरे व परिवाराचे दीपकआबांकडून सांत्वन
सांगोला :
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील स्व.भगवानराव (दादा) गोरे यांचे कांही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले.माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी स्व.भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाम.जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी (ता.माण,जि.सातारा) येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ९.३० वा.दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी गोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.याप्रसंगी, स्व.भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या दुःखातून सावरण्याचे बळ गोरे कुटुंबियांना मिळो आणि भगवानराव गोरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,अशी प्रार्थनाही यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन