सांगोला :
केंद्र व राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा,यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने “शेतकरी ओळखपत्र” (म्हणजेच फार्मर आयडी) काढणे अत्यंत गरजेचे असून मी ही काढत आहे व ते सर्वांनी काढून घ्यावे,असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी नाझरे येथील कार्यक्रमात केले.
सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना “शेतकरी ओळखपत्र” देण्यासाठी नाझरे विद्यामंदीरमध्ये कॅम्प लावून मोफत ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर केल्याने याबद्दल सर्व टीम व शेतकरी यांचे कौतुक करताना मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.
याप्रसंगी प्रारंभी,सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले.तसेच डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांच्या हस्ते शेतकरी आयडी फॉर्म प्रतीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली व रविराज शेटे यांच्या मागणी व सूचनेनुसार ओळखपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याचे मंडल अधिकारी हरीश जाधव यांनी यावेळी सांगितले.तसेच फार्मर आयडी साठी पैसे लागत नाही,शेतकऱ्यांनी आपला आयडी लवकर काढावा व यासाठी लवकरच घरोघरी फिरुन ओळखपत्र तयार करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे तलाठी किरण बाडीवाले यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच संजय सरगर,ग्रा.पं.सदस्य शशिकांत पाटील,लहुजी सेनेचे संस्थापक नितीन रणदिवे,सचिव अभिषेक कांबळे,महेश वाघमारे,प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,शेतकरी मुकुंद पाटील, बाळासो पाटील,कोंडीबा जावीर,शिक्षक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सीएससी सेंटरचे नितीन टिंगरे,बालाजी पालसांडे,समाधान आदाटे,ओंकार यादव,उत्तम साठे, अंकुश आदाटे,विकास आदाटे,देविदास लोखंडे, निरंजन केंगार,शरद कोळवले,खांडेकर,आनंद सोनवणे आदींचा सत्कार करण्यात आला.शेवटी तलाठी किरण बाडीवाले यांनी आभार मानले.
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली