सांगोला :
सांगोला येथील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स यांच्यातर्फे ऊर्जा व पर्यावरण विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
फॅबटेक इंजिनियरिंग कॉलेज,सांगोला येथील शिक्षक गणेश शिंदे सर व संदीप केदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ११० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रथम मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स या विभागाचे प्रमुख मंगेश कुलकर्णी सर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी,शाळेचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत इलेक्ट्रॉनिक घटक,सर्किट डिझाईन, सेन्सर्स तसेच अर्डीनिओ प्रोग्रामिंग याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी एल.इ.डी.सर्किट,सेन्सर प्रयोग आणि छोटे प्रोजेक्ट स्वतः तयार करुन प्रयोगात्मक शिकण्याचा आनंद घेतला.कार्यशाळे दरम्यान,विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जिज्ञासू वृत्ती उल्लेखनीय होती. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
सदर कार्यशाळा चालू असताना,माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापिका डॉ.संजीवनी केळकर व अध्यक्षा निलिमाताई कुलकर्णी यांनी कार्यशाळेस भेट दिली.त्यांनी मुलांना कार्यशाळेविषयी प्रश्न विचारले व मुलांनीसुद्धा त्यांना चांगल्याप्रकारे प्रश्नाची उत्तरे दिली. मल्टी स्कील फाउंडेशन कोर्समधील शिक्षक सत्यवान भिंगार्डे सर,सुशांत गावडे सर व माधुरी गोरे मॅडम हे ही यासमयी उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न