सांगोला :
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती सांगोला शहरातील खडतरे गल्ली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमीत्त प्रारंभी,सांगोला नगरपरिषदेत नगरपरिषद प्रशासन व समाज बांधवांच्या वतीने सकाळी १० वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी,माजी नगरसेवक किशोर बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बनसोडे, नगरपालिकेचे विद्युत अभियंता श्री.कांबळे यांनी संत रविदास महाराजांच्या विषयी सर्व समाज बांधवांसमोर आपले विचार व्यक्त केले. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगरपालिका प्रशासन अधिकारी श्री.पाडे, श्री.गाडे, श्री.कांबळे,कर निरीक्षक प्रियांका पाटील,आरोग्य निरीक्षक सुनील सर्वगोड यांनी केले.
यावेळी,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,उद्योगपती संजय खडतरे,दीपक खडतरे,प्रवीण खडतरे,ऋषिराज खडतरे,अॅड.ऋत्विक खडतरे,राजेश खडतरे,उद्योगपती विजय सराटे,उद्योगपती विजय सुरवसे,नारायण सुरवसे, शिवाजी खडतरे टेलर,उद्योगपती विठ्ठल हांडे,संतोष खडतरे, रमेश खडतरे,प्रशांत खडतरे,प्रवीण खडतरे,दीपक खडतरे, ऋषीराज खडतरे,पिराजी खडतरे,राहुल खडतरे,प्रशांत खडतरे,नितीन खडतरे,शैलेश खडतरे तसेच समाजातील बहुसंख्य युवक वर्ग,नगरपालिकेतील अधिकारी व कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली