सांगोला :
विद्यार्थिनींना शैक्षणिक,व्यावसायिक व वैयक्तिक मार्गदर्शन प्रदान करण्याच्या उद्देशाने सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष बी.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.संगीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुलींसाठी विशेष समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी,विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ.संगीता पाटील मॅडम यांनी,विद्यार्थिनींना करिअरच्या विवीध संधी,मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन व आत्मविश्वास वाढीविषयी मार्गदर्शन केले.तसेच राजमाता जिजाऊ,महाराणी ताराराणी,सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या आदर्श महिलांच्या उदाहरणांचा संदर्भ देत, आत्मविश्वास व स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच इम्युनिटी,हिमोग्लोबिन (HB),हार्मोनल असंतुलन यांसारख्या आरोग्य विषयक मुद्द्यांवरही सखोल मार्गदर्शन केले.
तसेच किशोरावस्थेत मुलींमध्ये होणाऱ्या शारिरीक व भावनिक बदलांवर चर्चा केली आणि हे बदल कसे व्यवस्थापित करावे ? याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच करिअर ध्येये निश्चित करण्याचे आणि विविध क्षेत्रात मुलींसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.अडथळे व आव्हानांवर मात करुन मुली त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कसा वाढवू शकतात ? याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थिनींना आर्थिक स्वातंत्र्य,भावनिक स्वातंत्र्य आणि मानसिक आरोग्य या महत्त्वाच्या विषयांवरही मार्गदर्शन केले.यावेळी,विद्यार्थिनींनी त्यांच्या शंकांचे निरसन करुन व्याख्यानाचा विशेष लाभ घेतला.
याप्रसंगी,प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी विद्यार्थिनींसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे महत्त्व काय आहे ? ते सांगितले आणि भविष्यात अधिक उपयुक्त उपक्रम राबवले जातील,असे सांगितले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी,कोमल पाटील मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या डॉ.संगीता पाटील मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख,सर्व महिला शिक्षिका यांच्यासह समन्वयक म्हणून प्रा.श्रीया कुलकर्णी व प्रा.कोमल पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया कुलकर्णी यांनी तर, आभार प्रदर्शन कोमल पाटील यांनी केले.
More Stories
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे
अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न