चिमुकल्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने
सांगोला :
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमीत्त आयोजित करण्यात आलेला ‘अभिनव फेस्टीव्हल’ अत्यंत जल्लोषपूर्ण आणि नयनरम्य वातावरणात नुकताच संपन्न झाला आणि या फेस्टीव्हलमध्ये स्कूलमधील चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने पालकांसह उपस्थितांची मने जिंकली.
अभिनव पब्लिक स्कूलच्या या कार्यक्रमाचे उदघाटन प्रतिथयश डॉ.शिवाजीराव ढोबळे,सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले,सरपंच अनिता पवार,उपसरपंच दत्तात्रय कोळवले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग कुरे,माजी सरपंच विष्णू देशमुख,माजी सरपंच चंद्रकांत कोळवले,प्रा.श्रीनिवास येलपले,चंद्रकांत पवार,राजाराम गुरव,धर्मराज लाडे,पत्रकार सचिन धांडोरे,विठ्ठल विभुते (पोलीस),प्रकाश विभुते,अशोक चौगुले,प्रा.शिवाजी विभुते,प्रा.राजाभाऊ कोळवले, बदडे सर,डॉ.संतोष वलगे,सागर सरगर,हनुमंत चव्हाण, सचिन पवार,रामचंद्र गाडेकर,पत्रकार नंदकुमार विभुते, पांडुरंग लाडे,दत्तात्रेय विभुते,सारंग गिड्डे (लाईटकोड सॉफ्टवेअर), संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे व मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे इ.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करुन गणेश वंदना या गीताने झाली.या कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपले उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिंदी,मराठी गीत,मोबाईल थीम,देशभक्तीपर गीत, गोंधळ गीत,साउथ इंडियन गीत,अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या.यामध्ये खास आकर्षण ठरलेले वाघ्या मुरळी नृत्य,धनगरी नृत्य, तानाजी थीम आणि विठ्ठल थीम अशा नृत्याविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी,विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे संपूर्ण व्यवस्थापक मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच अग्रेसर राहील.वेगवेगळ्या स्तरांवर मुलांच्या कौशल्याला आपण नक्कीच प्रोत्साहन देवू,असे मत व्यक्त केले. यावेळी रंगोत्सव स्पर्धेमधील तसेच शै.वर्ष २०२४-२५ मधील आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले.रंगोत्सव स्पर्धेमध्ये रोशन संतोष कोळवले याने द्वितीय क्रमांक मिळवला तर, आर्यन अमोल चौगुले यांने आर्ट मेरिट अवॉर्ड पटकावला.माध्यमिक विभागातून तेजस जगन लाडे हा आदर्श विद्यार्थी ठरला तर,समीक्षा दत्तात्रय खंडागळे ही आदर्श विद्यार्थिनी ठरली आणि प्राथमिक विभागातून प्रणव प्रकाश विभुते हा आदर्श विद्यार्थी ठरला तर,स्वराली रोहित बनकर ही आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराची मानकरी ठरली.
सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी अभिनव टीमचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे,रवींद्र भारती व सीमा कदम यांनी केले.संस्थाध्यक्ष लाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना शिंदे,काजल कोळवले,अर्चना खुळपे आदी विभाग प्रमुखांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
More Stories
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे
अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न