शैक्षणिक

सांगोल्याच्या शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा सप्ताह ‘कुरुक्षेत्र-२०२५’ उत्साहात संपन्न

 

सांगोला :

           सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित,शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह ‘कुरुक्षेत्र – २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख व क्रीडा समन्वयक प्रा.महेंद्र दौंड यांनी दिली.

                या क्रीडा सप्ताहाचे उदघाटन संस्थेचे सचिव अंकुश गायकवाड,डॉ.सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख,विश्वस्त डॉ.यशोदीप गायकवाड,सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश भोसले तसेच विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे डायरेक्टर विजय पवार यांचे हस्ते झाले.

        यावेळी बोलताना डॉ.सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख म्हणाल्या की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच वेगवेगळे मैदानी खेळदेखील आवश्यक असून शारीरिक विकास महत्त्वाचा आहे,असे डॉ.सौ.निकिताताई देशमुख म्हणाल्या.तर,संस्थेचे सचिव अंकुश गायकवाड म्हणाले की,खेळामुळे विद्यार्थ्यांचे मन,मेंदू आणि मनगट सक्षम होण्यास मदत होते.

या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट,कबड्डी,खो-खो,हॉलीबॉल तसेच लांब उडी,उंच उडी,१००,२०० व ४०० मिटर धावणे या आऊटडोअर स्पर्धा घेण्यात आल्या.तर,इनडोअर गेम्समधे चेस,कॅरम,बॅडमिंटन यांचे सामने देखील खूप चुरशीचे झाले.संपूर्ण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी आपले खेळाचे कसब दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेचे अंतिम सामने ९ जानेवारी रोजी पार पडले.

या स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. ए.देशमुख व स्पर्धा समन्वयक प्रा.एम.एस.दौंड,सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button