सांगोला :
सांगोला तालुक्यातील मानेगांव विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात नुकताच पार पडला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्या विकास मंडळ,जवळे या संस्थेचे सचिव सुभाष लऊळकर सर,कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय,जवळेचे प्राचार्य बाळासो शिंदे,श्रीराम विद्यालय हातीदचे प्राचार्य घोडके,मानेगांव विद्यालयाचे मुख्याध्यापक उबाळे, मुख्याध्यापक रविंद्र वाघमारे,क्रिडाशिक्षक अरुण खटकाळे,मानेगांवच्या सरपंच सौ.ताई माणिक बाबर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ बाबर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासो (दादा) बाबर,सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जून (तात्या) बाबर,सोनंद केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी साळे,माजी सरपंच नारायणभाऊ बाबर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनीही भेट दिली.या भेटीनंतर बोलताना संस्थाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून व वेगवेगळ्या खेळांमधूनच विद्यार्थ्यांच्या कलांगुणांना संधी मिळते आणि यामधूनच चांगल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थी घडतात,असे सांगून त्यांनी सहभागी विद्यार्थी तसेच मानेगांव व हणमंत गावच्या ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थी,पालक,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ या सर्वांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव लऊळकर सर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.यामधूनच चांगले सर्वगुण संपन्न विद्यार्थी निर्माण होतात आणि अशा कार्यक्रमातूनच नवीन कलाकार जन्माला येत असतो.
या कार्यक्रमासाठी भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर बाबर,मेजर माणिक बाबर,माजी उपसरपंच दगडू बाबर,माजी सरपंच अनिल बाबर,माजी सरपंच सचिन बाबर,माजी सरपंच वसंत बाबर,उपसरपंच तुकाराम बाबर,माजी सरपंच विश्वनाथ पाटील, प्रा.प्रकाश बाबर सर,विनोद पाटील गुरुजी,पोपट बाबर,माजी उपसरपंच अशोक मोरे,माजी चेअरमन लालासो बाबर,बाबर ट्रॅव्हल्सचे तानाजी बाबर,वस्ताद नारायण बाबर,चेअरमन बाळासाहेब शिंदे,युवा नेते बंडू बाबर,महादेव बाबर,तानाजी बाबर,ग्रा.पं.सदस्य बाबुराव भजनावळे,आण्णासो कांबळे तसेच मानेगांवचे उद्योजक,प्रगतशील शेतकरी,बागायतदार, आजी-माजी विद्यार्थी,मानेगांव व हणमंतगांवचे सर्व पालक उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत अरुण खटकाळे सर यांनी तर,प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक उबाळे सर यांनी केले.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्य सादर केले. यामध्ये टिपरी नृत्य,मंगळागौर,अंबाबाई गोंधळ,कोळी नृत्य,थीम डान्स,शेतकरी गीत,वासुदेव गीत,लावणी, देशभक्तीपर गीत,रेकॉर्ड डान्स,अंधश्रद्धावर आधारित नाटिका,शेतकरी आत्महत्या नाटिका यासारख्या कला सादर केल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरियोग्राफर बाळासो मिसाळ,फोटोग्राफर ठोकळे व साऊंड सिस्टीम व डेकोरेशन हे अमर मंडप,अकोला तसेच विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐवळे सर व शिंदे सर यांनी केले तर,आभार अरुण खटकाळे यांनी मानले.
——————————————————————————
More Stories
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे
अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न