महत्वाच्या बातम्या

दीपकआबांच्या हस्ते डिकसळ सोसायटीचे नूतन चेअरमन अरविंद कोरे यांचा सत्कार

 

सांगोला :

डिकसळ विकास सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी अरविंद लक्ष्मण कोरे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा म्हणाले की,नूतन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचा कारभार पारदर्शीपणे करुन गावाचा नावलौकिक वाढवावा. सोसायटीच्या प्रगतीसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनही दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी यासमयी दिले.

                          डिकसळ विकास सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी काल बुधवारी पार पडल्या.सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी अरविंद लक्ष्मण कोरे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सोसायटीचे नूतन चेअरमन अरविंद कोरे यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी सरपंच चंद्रकांत करांडे,सरपंच मधुकर करताडे,माजी उपसरपंच सुनिल बाबर,माजी उपसरपंच रणजित गंगणे,उपसरपंच मिलिंद कुलकर्णी यांच्यासह सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button