शैक्षणिक

सांगोल्याच्या भीमनगर शाळेत नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

सांगोला :

                   सांगोला येथील जि.प.प्रा.शाळा,भीमनगर येथे शाळेच्या वतीने पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख अस्लम इनामदार व गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले हे ही आवर्जून उपस्थित होते.यावेळी त्यांचेसह सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे व इतर मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि शाळेच्या वतीने नवागतांना (बालचमूंना) उपस्थित मान्यवरांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी,गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प,फुगे व क्रमिक पुस्तके देऊन करण्यात आले.शा.व्य.स स्था.प्रा. विजयाताई बनसोडे यांनी शाळेच्या शैक्षणिक अडचणी विषयी सविस्तर चर्चा केल्यानंतर आयु.बापुसाहेब ठोकळे तसेच शा.व्य.स.शिक्षणप्रेमींनीही यानिमीत्ताने बोलताना,शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर समाधान व्यक्त केले.यावेळी,नवीन वर्षाच्या शैक्षणिक यशासाठी विद्यार्थ्यांना सर्वांनीच खूप खूप शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास शा.व्य.स.अध्यक्षा कोमल ठोकळे, माजी अध्यक्षा दिपाली गायकवाड,मंजुषा बनसोडे, उमेश लोखंडे,राकेश आठवले,अनिताताई काटे, अंगणवाडी सेविका जयंतीताई बनसोडे व लक्ष्मी बनसोडे सर्व सदस्य व सर्व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी, सर्व विद्यार्थ्यांना शिरा,जिलेबी व गोड गोड खाऊ देण्यात येवून प्रवेशोत्सव मोठ्या आनंददायी वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाची प्रस्तावना जगताप सरांनी केली तर,श्रीम.शेळके बाई यांनी सर्वाचे आभार मानले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button