देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ सोलापुरात घडविणार होती दंगल – खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप
सोलापूर/प्रतिनिधी :
सोलापूर मतदारसंघाची निवडणूक ही पूर्णपणे भाजपाच्या हातून गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच,कट कारस्थानाला सुरुवात झाली. मतदानाच्या ५ दिवस अगोदरची त्यांची भाषणे काढून बघा,त्यांच्या हालचाली तशाच होत्या, पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने भाजपचे षडयंत्र फसले.या कालावधीत व मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले म्हणून कटू प्रसंग टळले नाहीतर,राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता,असा घणाघाती आरोप सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात केला.
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा प्रचंड मताधिक्क्याने विजय झाल्याबद्दल निवडणूक निकालानंतर,दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या वतीने सोलापूरच्या जामगुंडी मंगल कार्यालयात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात सोलापूरच्या नुतन खासदार प्रणिती शिंदेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.यावेळी,व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे,त्यांच्या पत्नी उज्वलाताई शिंदे तसेच काँग्रेससह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींपैकी सोलापूरची लढतही विलक्षण चुरशीची झाली होती. सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव केला.काँग्रेस पक्षाच्या या कृतज्ञता सोहळ्यात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना प्रणिती शिंदेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ सोलापुरात दंगल घडविण्याच्या प्रयत्नात होती पण,पोलीसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला, असा आरोप खा.प्रणिती शिंदे यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांवर केला.
—————————————————————
मी आणि माझी बायको घरी बसू :
प्रणिती या खासदार झाल्या असून तिला एकटीला लोकांमध्ये जावून काम करावे लागणार आहे.मी विश्रांती घेणार असून मी आणि माझी बायको आता,घरी बसू.
– जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे
—————————————————————
शिंदे साहेबांना सोबत घेवूनच काम करणार :
आजही अनेक नेत्यांना माझे नेतृत्व मान्य नाही,त्यामुळे अजून शिंदे साहेबांना सोलापुरातील लोकांमध्ये राहूनच काम करावे लागणार असून त्यासाठी,शिंदे साहेबांना सोबत घेवूनच मी काम करणार आहे.
– खासदार प्रणिती शिंदे——————————————————————————